sanya malhotra and fatima sana shaikh 
मनोरंजन

Web series : तुम्ही ‘या’ टॉप ६ वेब सीरीज पाहिल्या का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

टॉप ६ वेबसीरीजमध्ये (Web series) महिला पात्र मुख्य भूमिकेत आहेत. सीरीजच्या कथा महिला पात्राभोवती फिरणाऱ्या आहेत. या सीरीजमध्ये (Web series) महिलांच्या भूमिका दमदार आहेत. नेटफ्लिक्सने त्यांची वेब सीरिज आणि चित्रपटांची यादी जारी केलीय. चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये सशक्त महिला पात्र आहेत, ज्य प्रेक्षकांना नक्कीच प्रभावित करतील.

कटहल (Kathal)

एका छोट्या शहरात घडलेली ही कथा एका महिला अधिकाऱ्याभोवती विणलेली आहे. यामध्ये नेत्याचे बहुमूल्य कटहल (Kathal) गायब होतं. तरुण पोलीस अधिकारी सान्या मल्होत्रा​या विचित्र प्रकरणाची उकल करण्यासाठी मेहनत घेते. तिला स्वतःला सिद्ध करावे लागते. 'कटहल' हा यशवर्धन मिश्रा यांची दिग्दर्शित केलेली पहिला चित्रपट आहे. त्यांनी ज्येष्ठ, पुरस्कार विजेते लेखक अशोक मिश्रा यांच्यासोबत चित्रपटाचे सह-लेखन देखील केले आहे.

काळा (काला)

काला ही एका मुलीची कथा आहे जी आपल्या आईच्या प्रेमासाठी आसुसलेली असते. यामध्ये तृप्ती मुख्य भूमिकेत आहे.

थार

पाश्चात्य नोयर शैलींपासून प्रेरित, थारची कथा ऐंशीच्या दशकातील आहे. हर्षवर्धन कपूरने यामध्ये सिद्धार्थची कथा साकारलीय. पुष्करमध्ये नोकरीसाठी शिफ्ट झाल्यानंतर, सिद्धार्थ त्याच्या भूतकाळाचा बदला घेण्यासाठी निघतो. तो यशस्वी होईल की पुष्करमध्ये त्याला आणखी काही नवी संधी मिळू शकते? हे या सीरीजमध्ये दाखवण्यात आले आहे.

माई

यामध्ये साक्षी तन्वर मुख्य भूमिकेत आहे. ती ४७ वर्षाच्या शीलच्या भूमिकेत आहे. ती स्वत: चुकून गुन्हेगारी आणि राजकारणाच्या जाळ्यात अडकते. ज्यामुळे तिचे जग कायमचे बदलते.

मसाबा मसाबा सीझन २

जग खूप अवघड आहे. पण मसाबा आणि नीना गुप्ता त्याहूनही कठीण. मसाबा कॅमेऱ्यांसमोर जाते आणि नीना गुप्ताजी तिच्या मागे जाण्याचा निर्णय घेतेत. अशा प्रकारे आई-मुलीची जोडी या सीरीजच्या माध्यमातून दिसेल.

शी २

वेब सीरीज 'शी' का दुसरा सीजन (She season 2) असून यामध्ये मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री अदिती पोहनकर आहे. याची कहाणी क्राईम थ्रीलर सीरीज आहे. मुंबईची एक हेड कॉन्स्टेबल भूमिका परदेशीची कहाणी आहे. भूमिका आपल्या पतीशी वेगळी जालीय. ती आपली आई आणि बहिणीसोबत राहत आहे. भूमिकाच्यी पतीला घटस्फोट हवाय. नेटफ्लिक्सने या सीरीज आणि चित्रपटांची यादी जाहीर केलीय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT