Elon Musk and Grimes : अ‍ॅलन मस्क यांनी दुसऱ्यांदा दिली ‘गुड न्यूज’

Elon Musk and Grimes
Elon Musk and Grimes
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अब्जाधीश उद्योगपती अ‍ॅलन मस्क आणि प्रख्यात गायिका ग्रिम्स यांनी एका सुंदर मुलीला सरोगसीद्वारे जन्म देत दुसऱ्यांदा 'गुड न्यूज' दिली आहे. अ‍ॅलन मस्क यांनी स्वत:च्या ट्विटर हॅडेलवर ही आनंदाची माहिती दिली. अ‍ॅलन मस्क आणि ग्रिम्स जरी विभक्त झालेले असले तरी त्यांच्यात घनिष्ट प्रेम आहे, त्यामुळेच त्यांनी सरोगेसीचा निर्णय घेतला होता. या दोघांचे हे दुसरे अपत्य आहे, जिचे नाव 'एक्सा डार्क सिडरेल मस्क' असे ठेवण्यात आले आहे. मात्र अ‍ॅलन आणि ग्रिम्स तिला लाडाने व्हाय (Y) नावाने बोलवतात.

अ‍ॅलन मस्क हे टेस्ला आणि स्पेस एक्स या दोन कंपनीचे संस्थापक तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अ‍ॅलन आणि ग्रिम्स यांनी सरोगेसीव्दारे या मुलीला जन्म दिला आहे. एका मासिकाच्या रिपोर्टनुसार, आई ग्रिम्स हिने सांगितले की, तिच्या पहिल्या गर्भधारणेदरम्यान तिला शारिरीक त्रास झाला होता. त्यामुळे दुसऱ्या गर्भधारणेमध्ये काहीतरी गुंतागुत होईल या भीतीने आम्ही सरोगेसीव्दारे दुसऱ्या मुलाला जन्म दिल्याचे ठरवल्याचेही ती सांगते.

अ‍ॅलन आणि ग्रिम्स यांच्या पहिल्या मुलाचा नैसर्गिक पद्धतीने २००० मध्ये झाला होता. या मुलालाही ते लाडाने एक्स (X) या नावाने बोलवत असत. 'पेज सिक्स'च्या वादावरून दोघे एकमेकांपासून वेगळे झाले होते. याविषयी खुलासा करताना, मस्क यांनी सांगितले की, आम्ही वेगळे होत असलो तरी आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि सातत्याने आम्ही एकमेकांना भेटत राहू. मुलाचेही पालनपोषणही एकत्र करू असेही त्याने सागितले आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news