मनोरंजन

सारेगमप लिटिल चॅम्प्स : नायिकांच्या मांदियाळीत रंगणार नवरात्र

स्वालिया न. शिकलगार

सारेगमप लिटिल चॅम्प्स हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. प्रत्येक आठवड्यात हे सारेगमप लिटिल चॅम्प्स आपल्या भन्नाट परफॉर्मन्सने सगळ्यांना थक्क करतात. यातील काही स्पर्धकांनी या मंचाला निरोपही दिला.

या आठवड्यात नवरात्रीचा उत्साह कायम ठेवला जाणार आहे. सर्व स्पर्धक देवीला समर्पित करणारी गाणी सादर करणार आहेत. त्यांचं कौतुक करण्यासाठी मालिकांमधील प्रमुख नायिका मंचावर सज्ज होणार आहेत.

प्रार्थना बेहेरे, अन्विता फलटणकर, ऋता दुर्गुळे, श्वेता राजन, कुंजिका काळविण्ट, तन्वी कुलकर्णी, वैष्णवी करमरकर उपस्थित राहणार आहेत. अलका कुबल आणि प्रेरणादायी बीजमता राहीबाई पोपेरे देखील सहभागी होणार आहेत. या सर्व नायिकांच्या उपस्थितीत सगळे लिटिल चॅम्प्स खूप धमाल करणार आहेत.

त्यांच्या गाण्यांमुळे या नायिकांनी मंचावर ताल देखील धरला. काही गाणी त्यांचे डाेळे पाणावले.  या विशेष भागात परफॉर्मर ऑफ द वीक कोण ठरेल? गोल्डन तिकीट कोणाला मिळेल? आणि या मंचावरील कुठल्या स्पर्धकांचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

नवरात्री विशेष भाग  – गुरुवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT