movie Roop Nagar Ke Cheetey  
मनोरंजन

‘रूप नगर के चीते’ यादिवशी रिलीज होणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणत्याही शब्दांच्या चौकटीत न मावणारं नातं म्हणजे 'मैत्री'. रक्ताच्या नात्याच्या बंधापेक्षा मैत्रीच्या नात्याचे बंध अधिक घट्ट असतात. मैत्री … ती तशी कोणाबरोबरही होते, अनेकदा आपल्याही नकळत. त्याला वय, भाषा, धर्म, वर्ण कशाचीही मर्यादा नसते. अशाच एका मैत्रीची अनोखी गोष्ट एका मराठी चित्रपटातून लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. नाव आहे … 'रूप नगर के चीते'! दचकू नका..! नाव जरी हिंदी असलं तरी चित्रपट मात्र मराठी आहे. येत्या १६ सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' आपल्या भेटीला येतील, त्यापूर्वी या चित्रपटाचं एक धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. चिखलात माखलेले, कशाचीही पर्वा न करता, आपल्याच मस्तीत असलेले दोन जिगरी दोस्त आपल्याला त्यात दिसताहेत. ते कोण आहेत? त्याची ओळख लवकरच होणार आहे.

एस एंटरटेन्मेंट बॅनरखाली बॉलीवूड मधील संगीतकार मनन शाह यांनी 'रूप नगर के चीते' या मराठी चित्रपटाची निर्मिती केलीय. दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी हा चित्रपट साकारला आहे.

सध्याच्या जगात मैत्रीची व्याख्या जरी तीच असली तरी तीचं स्वरुप बदलताना दिसतंय. या चित्रपटातूनही मैत्रीमधला वेगळा विचार आपल्या समोर येणार आहे. दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन भिन्न शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत. चित्रपटातील कलाकार आणि इतर तपशीलांची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT