पिंपरी : कोरोनाचे नवे 59 रुग्ण | पुढारी

पिंपरी : कोरोनाचे नवे 59 रुग्ण

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 59 नवे रूग्ण बुधवारी (दि.15) आढळून आले. त्यामुळे शहरातील सक्रिय रूग्णांची संख्या 323 वर पोहचली आहे. ते सर्व रूग्ण होम क्वारंटाइन आहेत.

आज 35 रूग्ण बरे झाले. दिवसभरात 537 जणांची तपासणी करण्यात आली. तर, 2 हजार 311 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. शहरात 36 मायक्रो कन्टेन्मेंट झोन आहेत.

Back to top button