मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी अभिनेत्री मिताली मयेकर हिने कोरोना लस घेतलीय. तिचा कोरोना लस घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. तिने पहिला डोस घेतला आहे. त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर तिने शेअर केलाय. मात्र हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मिताली मयेकर ट्रोल झालीय.
अनेकजण इंजेक्शन घेताना घाबरतात. त्यात कलाकारदेखील मागे नाहीत. अनेक कलाकारांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलीय. काही जणांनी आपले फोटो शेअर करत अनुभवदेखील सांगितले.
काही स्टार्स आपण इंजेक्शन घेण्यासाठी घाबरतो. असे सांगत त्यांनी फोटो, व्हिडिओ शेअर केले. असाचं एक व्हिडिओ मितालीनेही शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये तिचे एक्स्प्रेशन पाहण्यासारखे आहेत.
मितालीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये ती कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेत आहे. पण, ती खूप घाबरलेली दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. इंजेक्शन पाहून ती अधिकचं अस्वस्थ दिसतेय. आणि आपला चेहरा लपवून ती इंजेक्शन घेतेय. तिला इंजेक्शनच्या सुईकडे पाहायलाही भीती वाटतेय.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी तिला ट्रोल करताहेत. ट्रोलर्सनी तिला सुनावलेय. इतके टॅटू काढून घेतलेस तेव्हा भीती वाटली नाही का? आता इतक्या साध्या इंजेक्शनला तू घाबरतेस.
एका नेटकऱ्याने म्हटलंय- 'सो मच ओव्हरऍक्टिंग'. तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, 'इतके टॅटू काढलेस तेव्हा भीती वाटली नाही का?' आणखी एकाने 'ओव्हरॲक्टिंग' असं म्हटलं आहे.
आणखी एकाने म्हटलं आहे, 'तू टॅटू बनवले आहेस. लस तर एक छोटी गोष्ट आहे'. या पध्दतीने मितालीली ट्रोल केलं जातंय.