किरण गायकवाडचा नवा चित्रपट नाद नवे पोस्टर रिलीज झाले आहे  Kiran Gaikwad Instagram
मनोरंजन

Marathi Movie | देवमाणूस फेम किरण गायकवाडच्या नाद चित्रपटाचे पोस्टर रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटात देवमाणूस फेम किरण गायकवाडचं कडक रूप पाहायला मिळणार आहे. 'नाद' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. मोशन पोस्टरवरील किरणची भेदक नजर 'नाद' करायचा नाय असंच जणू सांगत असल्याचं जाणवतं.

शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकर यांची निर्मिती असलेल्या 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाचे निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर आहेत. रुपाली पवार आणि वैशाली पवार यांची निर्मिती आहे. प्रकाश पवार यांचे दिग्दर्शन आहे. 'मिथुन', 'रांजण', 'बलोच' असे वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट देणारे प्रकाश पवार 'नाद'मध्ये काहीतरी भन्नाट दाखवणार असल्याची जणू चाहूलच मोशन पोस्टर देतं.

काय आहे नाद चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये?

राखाडी रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला किरण गायकवाड मोशन पोस्टरवर लक्ष वेधून घेतो. किरणचा चेहरा दाखवण्यापूर्वी त्याच्या उजव्या हातातील रक्तरंजित कोयता पाहायला मिळतो. किरणच्या चेहऱ्यावर तसेच अंगावर जखमा असून, त्याच्या डोळ्यांत अन्यायाविरोधातील आग आहे. किरणने आपल्या डाव्या हाताने घाबरलेल्या अवस्थेतील नायिकेला कवटाळलं आहे. त्यानंतर पोस्टरवर चित्रपटाचं 'नाद - द हार्ड लव्ह' हे टायटल येतं.

अभिनेत्री सपना मानेची अचूक साथ लाभली आहे. सपनाचा हा पहिलाच चित्रपट आहे.

महाराष्ट्राच्या लाल मातीतील खऱ्याखुऱ्या प्रेमाचे अनोखे कंगोरे उलगडण्याचं काम 'नाद' चित्रपट करणार आहे. एका हार्ड प्रेमाची कथा सांगणार आहे. या चित्रपटाची कथा संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. वैभव देशमुख यांच्या साथीने विनायक पवार यांनी गीतलेखनही केलं आहे.

या चित्रपटात किरण आणि सपनाच्या जोडीला यशराज डिंबळेही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी, तर सतीश चिपकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. संगीतकार पंकज पडघन यांचं संगीत लाभलं असून, कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली आहे. कलाकारांना यथायोग्य वेशभूषा करण्याचं काम निगार शेख यांनी केलं आहे. रमेश शेट्टी यांनी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिलं आहे. सुजित मुकटे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. तुषार घोडेकर आणि संकेत चव्हाण यांनी लाइन प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT