मनोरंजन

Kunjika Kalwint : ‘ही’ अभिनेत्री साकाणार शुभविवाह मालिकेत खलनायिका

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुरांबा आणि लग्नाची बेडी या दोन मालिकांना मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका शुभविवाह. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका. (Kunjika Kalwint ) अभिनेत्री कुंजिका काळविंट या मालिकेत पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने कुंजिकाची नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. (Kunjika Kalwint )

भूमीच्या सावत्र बहिणीची म्हणजेच पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळवीट म्हणाली, 'सगळीकडे लग्नाचा छान माहोल आहे आणि अशातच आमची शुभविवाह मालिका भेटीला येतेय. मी गेले वर्षभर एका चांगल्या कथानकाच्या आणि चांगल्या पात्राच्या शोधात होते.

शुभविवाह ही मालिका म्हणजे माझी स्वप्नपूर्ती म्हणता येईल. या मालिकेच्या निमित्ताने नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. पौर्णिमा या पात्राकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी मालिकेत खलनायिका साकारणार याचा अंदाज प्रेक्षकांना पहिला प्रोमो पाहूनच आला असेल. खरतर नकारात्मक भूमिका साकारताना खूप कस लागतो. मालिकेत हे पात्र पुढे काय करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. मालिकेत सगळे दिग्गज कलाकार आहेत.

भूमी आणि मी मालिकेत सावत्र बहिणी आहोत. मालिकेत आमचं पटत नसलं तरी पडद्यामागे मात्र आमची छान गट्टी जमली आहे. रुम शेअर करण्यापासून ते अगदी एकमेकांची मत जाणून घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी खूप आपलेपणाने करतो. या मालिकेमुळे मला एक छान मैत्रीण मिळाली आहे असंच म्हणायला हवं. प्रत्येक पात्र आपली एक छाप सोडत असतं. पौर्णिमा हे पात्र साकारणं एक अभिनेत्री म्हणून नक्कीच आव्हानात्मक आहे. स्टार प्रवाहसोबत माझी पहिली मालिका आहे त्यामुळे खूपच उत्सुकता आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT