मनोरंजन

आई कुठे काय करते : गौरी बद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

स्वालिया न. शिकलगार

आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकार आणि त्यांचा अभिनय सर्वांच्या पसंतील उतरले आहे. या मालिकेमध्ये अरुंधतीच्या बाजूने असणारी गौरी सर्वांचीच परिचयाची आहेत. अरुंधतीला मुलीप्रमाणे पाठिंबा देणारी goiri विषयी तुम्हाला माहिती आहे का? तिचं नाव आहे – गौरी कुलकर्णी.

तिचा जन्म २३ सप्टेंबरला बीडमध्ये झाला. सावरकर स्कूल, बीडमधूनच तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढे तिने इंजिनिअरिंग केलं. गौरी एक अभिनेत्री असण्यासोबतचं गायिकादेखील आहे. ती एक मॉडल देखील आहे.

आई कुठे काय करते ही तिची पहिली मालिका आहे. या मालिकेतील तिचे पात्र खूप गाजलेय.

तिचा आवडता अभिनेता जॅक निकोसन तर आवडती अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे. तिला बॅडमिंटन खेळायला आवडतं. फ़्रेंड्स (F.R.I.N.D.S) हा तिचा आवडता चित्रपट आहे. तर पुणे शहर तिला आवडतं.

पोषाखाबाबतीत सांगायचं झालं तर जीन्स आणि कॅज्युअल पेहराव करायला तिला आवडतं. तिला पिझ्झा, गुलाबजाम खूप आवडते.

आई कुठे काय करतेमध्ये ती मधुरानी गोखले – प्रभुलकर (अरुंधती), रूपाली भोसले आणि मिलिंद गवाली या कलाकारांसोबत काम करतेय.

आई कुठे काय करते या मालिकेचा 'अनुपमा' नावाने हिंदीमध्ये रिमेक आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT