मनोरंजन

Harish Roy : KGF 2 फेम ‘कासिम चाचा’ कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार अभिनेता यशचा हिट चित्रपट 'केजीएफ 2' (KGF 2) ने कलेक्शन बाबतीत अनेक रेकॉर्ड बनवले. हा चित्रपट भारतातच नाही तर परदेशातही सुपरहिट ठरला होता. 'KGF 2' मध्ये रॉकीच्या अंकलची भूमिका करणारा अभिनेता हरीश रॉय सध्या खूप कठीण प्रसंगातून जात आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो घशाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. (Harish Roy) कन्नड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्याने सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला KGF 2 च्या शूटिंगदरम्यान तो कॅन्सशी झुंज देत होता आणि कर्करोगामुळे आलेली सूज लपविण्यासाठी तो दाढी ठेवत असे. (Harish Roy)

केजीएफ २ हा बॉक्स ऑफिसवर १२०० कोटींहून अधिक कमाई करणारा यशस्वी चित्रपट आहे. हरीशने या चित्रपटात रॉकीच्या काका कासिमची भूमिका साकारली होती. हरीश २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या केजीएप चॅप्टर १ मध्येदेखील दिसला होता.

एका मुलाखतीत हरीशने त्याच्या आजाराबद्दल खुलासा केला. परिस्थिती तुम्हाला महानता देऊ शकते किंवा तुमच्यापासून गोष्टी काढून घेऊ शकते. पळून जाण्याचे भाग्य नाही. मी तीन वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त आहे. केजीएफमध्ये काम करताना मी लांब दाढी ठेवण्याचे एक कारण म्हणजे या आजारामुळे माझ्या मानेला सूज आली, जी लपवावी लागली, असेही त्याने सांगितले.

अभिनेता म्हणाला की, 'माझ्याकडे आधी पैसे नसल्यामुळे मी माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलली. मी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत वाट पाहिली. आता मी कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये आहे, परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. अभिनेत्याने सांगितले की त्याने चाहते आणि उद्योगातील लोकांना मदतीसाठीसाठीची व्हिडिओ रेकॉर्ड केला होत; परंतु तो पोस्ट करण्याचे धाडस करू शकलो नाही.

केजीएफ फ्रँचायझी व्यतिरिक्त, हरीशने बंगलोर अंडरवर्ल्ड, धन धना धन आणि नन्ना कनासीना हू यासारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. २५ वर्षांहून अधिक काळ ते कन्नड चित्रपटसृष्टीत कलाकार म्हणून सक्रिय आहेत. केजीएफ २ हा चित्रपट प्रशांत नील यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे, जो सर्वात जास्त मागणी असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक आहे आणि विजय किरागंदूर यांनी होम्बले फिल्म्स बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. या चित्रपटाला देश-विदेशात चांगलीच पसंती मिळाली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT