Isha Keskar: आई शपथं लय भारी दिसतेस 👌,ईशाच्या एका स्माईलवर सगळे फिदा ❤️ | पुढारी

Isha Keskar: आई शपथं लय भारी दिसतेस 👌,ईशाच्या एका स्माईलवर सगळे फिदा ❤️

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री ईशा केसकरचा अंदाज नेहमीच हटके असतो. ईशा नेहमी आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही तिने साडीतील मनमोहक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल. पिवळ्या रंगाची फ्लोरल साडी, काळ्या रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज, ईअररिंग्ज, केसात जास्वंदाचे फुल असा तिचा पहेराव दिसतो. माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये तिने गॅरीच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. या मालिकेतून ईशाला अमाप प्रसिद्धी मिळाली.

ईशाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठी कलाविश्वातील ऋषी सक्सेना या लोकप्रिय अभिनेत्याला ती डेट करत आहे. ती ऋषी सक्सेनासोबतचे फोटो ती शेअर करत असते. ऋषी सक्सेना याने सायली संजीवसोबत काहे दिया परदेस ही मालिका केली होती. तर ईशाने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ईशाला चांगली ओळख मिळाली.

कलाविश्वाप्रमाणेच ईशा सोशल मीडियावरही सक्रीय आहे. तिच्या सुंदर व्हिडिओमुळे आणि फोटोंमुळे ती अनेकदा चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर ईशाच्या नव्या फोटोंची चर्चा रंगलीय. My Beautiful SHANU BABY 😍😍❤️❤️❤️❤️❤️MMMUUAAAAAA😘😘अशी कमेंट अभिनेत्री किशोरी अंबिये यांनी केली आहे. किशोरी आणि ईशा यांनी माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत काम केलं होतं. किशोरी अंबिये ईशाच्या आईच्या भूमिकेत होत्या.

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्या भेटीतच ईशाला ऋषी आवडला होता. ईशाने ऋषीला कॉफीसाठी विचारलं. या कॉफी डेटनंतर त्यांची लव्हस्टोरी सुरु झाल्याचे म्हटलं जाते.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Sane (@saneshashank)

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Keskar (@ishagramss)

 

View this post on Instagram

 

A post shared by Isha Keskar (@ishagramss)

Back to top button