मनोरंजन

Katrina kaif : फ्लोरल बिकिनीत कॅटचे फोटो कैद, प्रियांका चोप्रा म्हणाली…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफच्या नव्या फोटोंनी सोशल मीडिय़ावर धुमाकूळ घातला आहे. इन्स्टाग्रामवर तिने बिकिनीतील दोन फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर देसी गर्ल प्रियांका चोप्राने प्रतिक्रियाही दिलीय.

निळ्या रंगाचा टॉप आणि फ्लोरल लोअर बिकिनीमध्ये कॅट नेहमीप्रमाणे सुंदर दिसतेय. ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रानेही कॅटच्याबिकिनीतील हॉटनेसवर कमेंट दिलीय. इन्स्टाग्रामवर चाहत्यांनीही या फोटोशूटवर कमेंट दिल्या आहेत. अभिनेत्रीचा हा अप्रतिम लुक आणि स्टाईल प्रत्येकाचे मन मोहून घेत आहे.

मोकळे केस आणि चमकणारी त्वचा

कॅटने अधिकृत इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कॅट खूपच हॉट दिसतेय. तिची चमकणारी त्वचा आणि मोकळे केस सर्वांना आकर्षून घेत आहेत. या फोटोंना तिचे सासरे श्याम कौशल यांनीही लाईक केले आहे.

कॅटचे नवीनतम बिकिनी फोटो पाहून प्रियांका चोप्राने कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया दिली. तिने फायर इमोजी शेअर केले आहे. दरम्यान, दोन तासात सोशल मीडिया युजर्सनी सहा लाखांहून अधिक लाईक्स केले आहेत. त्याचबरोबर फॅन्सही या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, उत्तम. आणखी एकाने लिहिले आहे-तुझे डोळे सुंदर आहेत. याशिवाय इतर लोकही या फोटोंवर कमेंट करून तिच्या सौंदर्याची प्रशंसा करताना दिसत आहेत. तिची बिकिनी लूकमधील किलर पोज आणि आकर्षक परफॉर्मन्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

कॅटचे आगामी चित्रपट

कॅट सध्या तिच्या आगामी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मग्न आहे. या चित्रपटात ती विजय सेतूपतिससोबत दिसेल. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या मेरी ख्रिसमस या चित्रपटाच्या सेटवरून अलीकडेच तिचे काही फोटो लीक झाले होते. याशिवाय ती यावर्षी भूत पोलिसमध्येही दिसणार आहे. कॅटरीना लवकरच सलमान खानसोबत टायगर ३ या चित्रपटातही दिसणार आहे.

SCROLL FOR NEXT