Mithila Palkar : बोल्ड, ब्युटीफूल मिथिलाचा ब्रा-कोटमध्ये हॉट लूक | पुढारी

Mithila Palkar : बोल्ड, ब्युटीफूल मिथिलाचा ब्रा-कोटमध्ये हॉट लूक

पुढारी ऑनलाईन : मराठीतील बोल्ड, ब्यूटीफुल अभिनेत्री मिथिला पालकर (Mithila Palkar) नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करून अॅक्टिव्ह असते. सध्या तिच्या एका ब्लॅक अँड व्हाईट फोटोने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री मिथिला पालकरने (Mithila Palkar) नुकतेच आपल्या इन्टाग्रामवर एका ब्लॅक अँड व्हाईटमधील बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने ब्रा, कोट आणि पॅन्ट परिधान केली आहे. मराठीतील अभिनेत्रीने पहिल्यांदा बोल्ड फोटो शेअर केल्याने सोशल मीडियात खूपच व्हायरल होतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने Outtake असे लिहिले आहे. शेअर केलेल्या फोटोत मिथिलाच्या कुरळ्या मोकळ्या केसांनी चारचॉद लावले आहेत. या फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून तिच्या स्टाईलचे कौतुक केले आहे. यात काही नेटकऱ्याने ‘Very classy, M! 👏’, ‘Oooh and I wanna take you out’, ‘Gorgeous 🤍🤍’, ‘Queen on action❤️’, ‘Stylish ❤️’, ‘Amazing🔥’. यासारख्या अनेक कॉमेन्टस दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मिथिलाच्या फोटोवर हार्ट ईमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे.

याआधीही मिथिलाने ब्लॅक रंगाच्या ड्रेस, कुरळ्या केसांसह मेकअपमधील फोटो शेअर केले आहेत. हा तिचा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता. याशिवाय मिथिलाच्या इन्स्टाग्रामवर तिच्या वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो पाहायला मिळतात. तिचे इन्स्टाग्रामवर ३० लाखांहून अधिक फालोअर्स आहेत.

मिथिला पालकर ‘लिटिल थिंग्ज’ या वेबसीरिजमधून प्रकाश झोतात आली. मिथिला ही कप साँगमुळे चाहत्याच्या घराघरात पोहोचली. यानंतर ती बिंदास ओरिजिनल्सच्या ‘गर्ल इन द बिग सिटी’ आणि ‘कारवां’ चित्रपटात दिसली.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreeja Rajgopal (@shreejarajgopal)

Back to top button