मनोरंजन

Rishab Shetty: ‘कांतारा’च्या यशानंतर ऋषभ शेट्टीने घेतले सिद्धिविनायक दर्शन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी त्याच्या 'कंतारा' चित्रपटाच्या यशाने खूप खूश आहे. (Rishab Shetty) रविवारी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी ते सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला. ऋषभ शेट्टीने मंदिराबाहेर चाहत्यांची भेट घेतली आणि फोटोसाठी पोजही दिली. ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'कंतारा'ने जगभरात २५० कोटींची कमाई केली आहे. 'कंतारा'च्या यशानंतर सिद्धिविनायक मंदिरामध्ये ऋषभ शेट्टीने गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले आणि पूजाही केली. (Rishab Shetty)

'कंतारा'ची जगभरात २५० कोटींची कमाई

ऋषभ शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला 'कंतारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट जो केवळ प्रादेशिक प्रदर्शनाच्या उद्देशाने बनवला गेला होता. नंतर तो मोठ्या मागणीनुसार हिंदीत डबही झाला आणि आज 'कंतारा' संपूर्ण भारतात यशस्वी झाला आहे.

रविवारी, ३० ऑक्टोबर रोजी ते मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. येथे त्यांनी प्रार्थना करून गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.
ऋषभ शेट्टीला पाहण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराबाहेर मोठी गर्दी झाली होती. एवढेच नाही तर ऋषभ शेट्टीने मंदिराबाहेर चाहत्यांसोबत भरपूर फोटोही काढले. ऋषभ शेट्टीचा कांतारा मूळ कन्नड भाषेत बनवला गेला होता आणि तो ३० सप्टेंबर, २०२२ रोजी रिलीज झाला होता. १४ ऑक्टोबर रोजी ते हिंदीत डब करून रिलीज करण्यात आला.

'कंतारा'ने जगभरात २५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि अशी कामगिरी करणारा हा तिसरा कन्नड भाषेतील चित्रपट आहे. रिपोर्ट्सनुसार, 'कंतारा' अवघ्या १५ कोटींमध्ये बनला आहे. त्याचवेळी, 'कंतारा'ने देशभरातील सर्व भाषांमध्ये ३१ दिवसांत २२६.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ऋषभ शेट्टीने 'कंतारा'मध्ये केवळ अभिनयच केला नाही, तर त्याचे दिग्दर्शनही केले आहे आणि कथाही लिहिली आहे.

ऋषभ शेट्टीनेच सांगितले, त्याने 'कंतारा' का दिग्दर्शित केला?

ऋषभ शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले की, 'कंतारा' ची कथा एक सत्य कथा आहे, जी त्याच्या गावातील आहे. पण कांताराचं जग पूर्णपणे काल्पनिक आहे. ऋषभ शेट्टीने असेही सांगितले की यापूर्वी तो फक्त ओटीटीवर 'कंतारा' रिलीज करण्याचा विचार करत होता. पण चित्रपटाची चर्चा झाली आणि तो लोकप्रिय ठरला. जेव्हा ऋषभ शेट्टीला विचारण्यात आले की त्याने हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय का घेतला. यावर तो म्हणाला, 'जेव्हा मी अभिनय करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून मला या प्रकारच्या व्यक्तिरेखेचा शोध घ्यायचा होता. 'कंतारा' दिग्दर्शित करण्यासाठी मला दुसरा दिग्दर्शक मिळाला असता. पण त्याला या कथेचा गाभा आणि महत्त्व समजणे कठीण झाले असते.'

मांसाहार सोडला, पाठीला दुखापत

ऋषभ शेट्टीने सांगितले की, 'कंतारा'मधील देव कोला सीक्वेन्सच्या शूटिंगच्या २०-३० दिवस आधी त्याने मांसाहार सोडला होता. चित्रपटात एक सीन आहे ज्यामध्ये ऋषभ शेट्टीला काठीने मारहाण केली जात आहे. ऋषभने सांगितले की हा मूळ सीन होता आणि त्याने तो स्वतः शूट केला होता. यावेळी त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती.

SCROLL FOR NEXT