मनोरंजन

कंगनाचा ‘तेजस’ दसर्‍यात रीलिज होणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री कंगना राणावत हीचा आगामी चित्रपट 'तेजस' ची रीलिज डेट घोषित करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी दसर्‍यानिमित्त 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात कंगनाने एअरफोर्स अधिकारी 'तेजस' गिल यांची भूमिका साकारली आहे.

सर्वेश मेवाडा यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. 'तेजस'ची निर्मिती आरएसव्हीपी या बॅनरने केली आहे. त्यांनी यापूर्वी 'उरी ः द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाची निर्मिती केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT