RRR trailer : ‘आरआरआर’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज (Video) | पुढारी

RRR trailer : ‘आरआरआर’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतिक्षीत ‘आरआरआर’ (RRR trailer) या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवार, ९ डिसेंबर रोजी रिलीज झाला. चित्रपट ट्रेड विश्‍लेषक तरण आदर्श यांनी या आधी ट्रेलर रिलीज होणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली होती. (RRR trailer)

आतापर्यंत या चित्रपटातील टीझर आणि गाण्याची झलक समोर आली होती. या चित्रपटाचे बजेट ४५० कोटी रुपये असून रीलिजपूर्वीज विविध हक्कांच्या विक्रीतून चित्रपटाने जवळपास एक हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Image

या चित्रपटात रामचरण तेजा, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ७ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

३ मिनिट १५ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये राम चरन आणि एनटीआर ज्युनियर यांची दमदार ॲक्शन आहे. अंगावर काटा आणणारा हा ट्रेलर आहे. आरआरआर दोन भारतीय क्रांतिकारि, अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्याविषयी एक काल्पनिक कहाणी आहे. त्यांनी क्रमशः ब्रिटिश राज आणि हैदराबादच्या निजामाविरोधात लढाई लढली होती.

ही मल्टी-स्टारर चित्रपट आहे. यामध्ये राम चरण आणि एनटीआर ज्युनियरसोबत अजय देवगन-आलिया भट्ट यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाच्या ट्रेलरने उत्सुकता वाढवली आहे. बाहुबली सीरीजचे मास्टरमाईंड तेच होते.

Back to top button