Jurassic Park Actor Sam Neill Dies pudhari
मनोरंजन

Jurassic Park Actor Sam Neill Dies: ज्युरासिक पार्क फेम सॅम नील यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Anirudha Sankpal

Jurassic Park Actor Sam Neill Dies: ज्युरासिक पार्क या गाजलेल्या चित्रपटातील डॉक्टर एलन ग्रांट यांची भूमिका निभावणाऱ्या सॅम नील यांनी आज ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. सॅम यांनी कॅन्सरवर मात केली होती असं देखील सांगण्यात आलं आहे.

कुटुंबीयांची पोस्ट

कुटुंबीयांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'खूप वेदनेनं आम्हाला सांगावं लागत आहे की सोमवारी १३ जुलै रोजी सिडनी इथं सॅम नील यांचे निधन झाले. सॅम आपल्या शेवटच्या क्षणात आपल्या कुटुंबासोबत होते. हा मृत्यू अचानक आणि धक्कादायक होता. त्यांनी कॅन्सरवर मात केली होती. कुटुंब म्हणून आम्ही सर्वांना विनंती करतो की या मोठ्या दुःखाच्या प्रसंगी आमच्या प्रायव्हसीचा सन्मान केला जावा.'

सॅम नील गेल्या पाच वर्षांपासून नॉन हॉजिकल लिंफोमा (ब्लड कॅन्सरचा एक प्रकार) सारख्या जीवघेण्या आजाराशी लढत होते. त्यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की त्यांच्यावर सुरू असलेल्या केमोथेरपीचा प्रभाव बंद झाला आहे. त्यानंतरही सॅम नील यांनी कॅन्सरवर मात केली होती. अभिनेता म्हणाला होता की, माझ्या केमो थेअरपीने काम करणं बंद केलं होतं. मी अत्यंत हतबल होतो. माझा अंत जवळ आला होता. हे काही चांगलं नव्हतं. मात्र मी कॅन्सरवर मात केली होती.'

सॅम नील यांची संपत्ती किती?

सेलिब्रिटी नेटवर्थ रिपोर्टनुसार सॅम नील यांची एकूण संपत्ती ही जवळपास १८ मिलियन डॉलर (जवळपास १.५ अब्ज रूपये) आहे. त्यांनी ज्युरासिक पार्क चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटाचे अनेक सिक्वेल देखील आले होते. त्यात देखील त्यांनी मुख्य भूमिका केली होती.

ज्युरासिक पार्क सोबतच नील यांनी आंद्रे जुलावस्की यांच्या पजेशन या हॉरर चित्रपटात देखील काम केले होते. सॅम नील यांनी टॉम क्लेसी यांच्या जॅक रायन थ्रिलर सीरीजमधील पहिला द हंट फॉर रेड ऑक्टोबर मध्ये देखील अभिनय केला होता. त्यांनी द पियानो मध्ये देखील लीड रोल केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT