Sharad Kapoor Video: शरद कपूर हा १९९० ते २००० च्या दशकातील एक दर्जेदार अभिनेता आणि खलनायकी भूमिका बजावणारा कलाकार असून त्याने अनेक व्हिलन पडद्यावर अत्यंत ताकदीनं उभे केले आहेत. त्याचा शाहरूख खान सोबतचा जोश हा चित्रपट देखील चांगला गाजला होता. मात्र तो अचानक मोठ्या पडद्यावरून गायब झाला. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते हाच का तो शरद कपूर असं म्हणत आहेत.
शरद कपूर जरी लाईट कॅमेरा अॅक्शन पासून दूर असला तरी लोक त्याचे काम विसरलेले नाहीत हे नुकत्याच त्याच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवरून सिद्ध होते. शरद कपूर यांची एक मैत्रिण हेमा चौधरी या मुंबईतील बेजुबान पब्लिक वेलफेअर ट्रस्ट ही एनजीओ चालवतात. त्यांनी शरद कपूरने त्यांचे ४ श्वान आपल्याकडे का आणून दिले हे या व्हिडिओमार्फत सांगितलं.
शरद कपूर हा शारीरिक आणि आरोग्यासंदर्भातील आव्हानांचा सामना करत आहे असं तिची मैत्रिण हेमा चौधरीनं सांगितलं. त्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त करणारे अनेक मेसेज या व्हिडिओखाली केले आहेत. अनेकांनी शरद कपूरच्या जुन्या ऑन स्क्रीन आठवणींना उजाळा दिला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शरद कपूरने आपणाला कामाची गरज असल्याचं सांगितलं अन् बार्सिलोनामध्ये फुटबॉल खेळताना मला दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी २ महिन्यात ती दुखापत बरी होईल असं सांगितलं. आता शरदने चित्रपट, मालिका, ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यास उत्सुक असल्याचं सांगत तुम्हाला माहिती आहेच की मी एक चांगला अभिनेता आहे असा आत्मविश्वास देखील बोलून दाखवला.
यानंतर त्याने ९० त्या दशकात अनेक व्हिलनचे रोल केले. त्याची शाहरूख खानशी देखील तुलना होत होती. त्याने जोशमध्ये शाहरूख खानच्या तोडीस तोड काम केले होते. शरद कपूरने मन्सूर खान यांच्या जोश चित्रपटात प्रकाश शर्माची भूमिका साकारली. ती भूमिका सर्वाधिक गाजली. .
शरद कपूरने गाजलेल्या जोश या चित्रपटात प्रकाश शर्मा हे खलनायकी पात्र साकारलं होतं. त्याने शाहरूख खानच्या विरोधात भूमिका केली होती. शरद कपूरने १९९१ मध्ये पहिल्यांदा लक्ष्मणरेखा या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. त्याने १९९४ मध्ये पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. त्याने मेरा प्यारा भारत या चित्रपटातून अभियनात पदार्पण केलं. त्यानंतर त्याने १९९५ मध्ये महेश भट्ट यांच्या स्वाभिमान या मालिकेतून टीव्हीवर झळकला होता.