मनोरंजन

जीव माझा गुंतला : रिक्षाचालक रेखा दुधाणे यांनी घेतली योगिताची भेट

स्वालिया न. शिकलगार

:

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जीव या मालिकेत गुंतलाय असं म्हणायला हरकत नाही. मालिकेत अंतराची भूमिका योगिता चव्हाण साकारते आहे. तिने स्वत: या भूमिकेसाठी रिक्षा कशी चालवायची याचे प्रशिक्षण घेतले. सेटवर अंतराला म्हणजेच योगिताला एकदिवशी सरप्राईझ मिळाले. जेव्हा रेखा दुधाणे तिला भेटायला सेटवर आल्या.योगिता म्हणते- माझ्यासाठी तर ती "ग्रेट भेट"चं.

योगिता चव्हाण

रिक्षा चालवणे शिकले. पण खरी गंमत तेव्हा आली, जेव्हा मला रिक्षा चालवताना संवाद देखील बोलायचे होते.

ॲक्टिंग देखील करायची होती; पण म्हणता म्हणता मालिकेतील अंतरा आणि तिची हमसफर (रिक्षा) यांनी प्रेक्षकांची माने जिंकली.

तिचा हमसफर सोबतचा संवाद असो व तिचं आणि हमसफर नातं असो.

योगिता म्हणाली, "रेखा दुधाणे महाराष्ट्रातील पहिल्या महिला रिक्षाचालक. त्या अचानक एक दिवस आम्हाला भेटायला जीव माझा गुंतला मालिकेच्या सेटवर आल्या.

जेव्हा त्या रूममध्ये आल्या तेव्हा त्यांची dashing personality बघून मला काही शब्दच सुचले नाही.

त्यांचा तो खाकी गणवेश आणि चेहर्‍यावर एक वेगळंचं तेज होतं. त्यांनी गोड अशी स्माईल दिली.

रिक्षाची चावी फिरवत रूममध्ये एंट्री केली. त्यांना समोर बघून अचानक अंतराचं भविष्य माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं.

मला माझ्यावर सोपावलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक प्रकार्षाने झाली. पण, या गोष्टीचा आनंद सुध्दा झाला की, मालिकेद्वारे आपण अशा एका personality ला रिप्रेझेंट करतो आहे.

जेव्हा त्यांनी अंतराची तारीफ केली तेव्हा मी कसेबसे माझे अश्रू आवरू शकले.

त्या रिक्षाचालक नसून त्या नर्सदेखील आहेत.

रेखाताईंनी आयुष्यात मुलगी, बहीण, बायको आणि अशा अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत.

गेले तीसहून अधिक वर्ष नर्सिंग क्षेत्रात काम केलंय.

रिक्षा चालवून संसाराला चांगलाच हातभार लावत आहेत.

मला आशा आहे रेखा ताईंच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्राचं प्रेम यामुळे मी देखील अंतराच्या भूमिकेला न्याय देऊ शकेन, असं योगिता म्हणते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT