पुढारी ऑनलाईन डेस्क : जान्हवी कपूरने मासिक पाळीदरम्यान तिच्या मूड स्विंग्जचा कसा परिणाम व्हायचा, याबद्दल खुलासा केला आहे. शिखर पहारियासोबतच्या तिच्या नातेसंबंधावर कसा परिणाम झाला, तिने हे देखील उघड केले आहे. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या मूड स्विंग्जमध्ये किती वेळा तरी तिचे हृदय तुटले होते, असे ती सांगते.
जान्हवी कपूरने सांगितले की, प्रत्येक महिन्याला तिचे बॉयफ्रेंडशी भांडण व्हायचे. त्यानंतर ती ब्रेकअप करायची. तिला स्वत:ला याचे कारण समजत नव्हते. सर्वकाही मूड स्विंग्जच्या कारणाने होत होतं. जान्हवीने सांगितलं की, सुरुवातीला तिला पीएमएसवेळी मूड स्विंगचा सामना करावा लागला. जान्हवीने एका मुलाखतीत या गोष्टींचा खुलासा केला आहे.
जान्हवी कपूरने सांगितलं की, पीएमएस आणि त्या कारणाने होत असलेले मूड स्विंग्जचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत असलेल्या नात्यावर काय परिणाम झाला. अभिनेत्री जान्हवीने सांगितलं- 'पीरियड्सच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये ती शिखरशी ब्रेकअप करायची, त्यावेळी दोन-तीन महिने तिच्या बॉयफ्रेंडलाही धक्का बसायचा. त्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडलाही याची सवय झाली. नंतर तो म्हणू लागला- 'हो, ठिक आहे'.
जान्हवी कपूरने पुढे हेदेखील मान्य केलं की, ती पुन्हा बॉयफ्रेंडकडे जाऊन माफी मागायची. 'दोन दिवसांनंतर रडत रडत त्याच्याकडे जाऊन माफी मागायची आणि सॉरी म्हणायची. ती म्हणायची मला समजत नाही की आता माजा मेंदू असं का करत आहे, हे खूपच विचित्र होतं.'