मनोरंजन

Janhvi Kapoor : महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिनेत्री जान्हवीने केले ‘असे’ स्मरण

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री जान्हवी कपूरने  बॉलिवूडमध्‍ये स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या जान्हवी तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच दरम्यान तिची आणि टीमच्या अनेक ठिकाणी शो आणि मुलाखती पार पडत आहेत. दरम्यान, एका मुलाखतीत जान्हवीने महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्‍मरण केले.

इतिहासातील असा कोणता काळ आवडेल

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान 'द लल्लनटॉप' ला दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीला काही प्रश्न विचारण्यात आले. यात खास करून जान्हवीला 'इतिहासातील असा कोणता काळ आहे, जो तुला पुन्हा पहायला आवडेल?" असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना जान्हवीने सांगितले की, "मला इतिहासाची आधीपासून खूपच आवड आहे. भारतीय राज्‍यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या घटना समितीचे सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहणे खूप महत्त्वाचे वाटते. आंबेडकर आणि गांधी कोणत्या मूल्यांसाठी लढले, याचा देशातील नागरिकांवर कसा परिणाम झाला?, समाजाला कसा फायदा झाला?. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आपल्या समाजाला काय दिलं?" याबद्दलची  चर्चा ऐकायची आहे, असे तिने सांगितले.

मुलाखातीत जान्हवीने "वरील प्रश्नाचे उत्तर तुम्हाला खरंच पाहिजे असेल तर, यानंतर कोणताही प्रतिप्रश्न विचारू नका. कारण माझी मतं चाहत्यांपर्यंत कोणत्या उद्देशाने पोहोचतील, याचा अंदाज बांधता येणार नाही असेही तिने म्हटलं आहे. याशिवाय जान्हवीला तिच्या शाळेत किंवा घरात जातीच्या विषयावरून कधी चर्चा झाली आहे काय? असा प्रश्नही विचारण्यात आला. याचे उत्तर देताना जान्हवीने जात या विषयावर कधीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.

वक्रफंन्टबद्दल बोलायचे झाल्यास जान्हवी आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव मुख्य भूमिकेत असणार आहे. शरन शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. जान्हवीने तिच्या भूमिकेसाठी १५० दिवसाचे प्रशिक्षण घेतले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT