मनोरंजन

Esha Gupta : ईशाने पिंक कलरचा ब्लश ड्रेसचं बटण खोललं अन्…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलसोबत आगामी 'आश्रम ३' वेब सिरीजमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता ( Esha Gupta )  झळकणार आहे. या चित्रपटाच्या तिसरा सीझनमध्ये बॉबीसोबत ईशाचे बोल्डसीन दाखवण्यात येणार आहेत. ईशा गुप्ता तिच्या बोल्डनेस आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. सध्या  एका ड्रेसमुळे तिने  सोशल मीडियाचे तापमान वाढविलं आहे.

अभिनेत्री ईशा गुप्ताने ( Esha Gupta ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने पिंक कलरचा ब्लश ड्रेस परिधान करून चारचॉद लावले आहेत. मोकळ्या केसांसह तिच्या मेकअपने तिच्या सौदर्यांत भर घातली आहे. यासोबत तिने मॅचिंग हिल्सदेखील परिधान केल्या आहेत. ईशाने कधी आरशात तर कधी जिन्यावर हॉट पोझ दिल्या आहेत. यातील खास म्हणजे, ईशाने तिच्या पिंक ड्रेसचे बटण खोलून हटके पोझ दिली आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसतेय.

ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकरांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात ध्रुव कपूरने तीन हार्ट ईमोजी शेअर करून तिचे कौतुक केलं आहे. याच दरम्यान काही युजर्सनी 'Gorgeous', 'Wow ❤️❤️', 'Gorgeous❤️Love it???', 'Beautiful ?', 'Awsm', 'Looking ?', 'Killer look?'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. याशिवाय काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर करून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या फोटोला आताप्रर्यत ४ लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

याआधीही ईशाने पांढऱ्या रंगाच्या बिकिनीवर पारदर्शक श्रग घालून फोटोशूट केलं होतं. तिच्या या फोटोतील बोल्डनेसने चाहत्यांना भूरळ घातली होती. या फोटोला तिने 'M for LOVE' असे कॅप्शन देत हटके पोझ दिली होती. ईशाच्या इन्स्टाग्रामवर पाहिले तर तिच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातल्याचे दिसतेय. ईशाचा अभिनेता बॉबी देओलसोबत आगामी 'आश्रम ३' वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म लवकरच येत आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT