मनोरंजन

bigg बॉस मराठी 3 : याचा प्रयत्न काही संपता संपेना!…

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ( bigg बॉस मराठी 3 ) काल तीन नव्या सदस्यांची एन्ट्री झाली. यात घरात आलेल्या तृप्ती देसाईंनी विशाल, मीरा, मीनल यांचे भरभरून कौतुक केले. आणि Looser हे लॉकेट सोनालीला दिले तर आदिशने देखील त्याला काय वाटते आहे ते सदस्यांना सांगत मीराला Looser हे लॉकेट दिले.

bigg बॉस मराठी 3 घरामध्ये स्नेहाचे मात्र, वेगळेच रूप बघायला मिळाले आहे. घरातील काही सदस्यांना तो performance वाटला खरा. पण, तिच्या वागण्याने आणि बोलण्याने घरातील जय दुधाणे व्यक्ति खूप दुखावली गेली. जी तिच्या अत्यंत जवळची होती.

जय दुधाणेला स्नेहाने Looser हे लॉकेट देखील दिले. त्यांच्या मैत्रीचा त्याने फायदा घेतला, तिच्यामागे त्याने तिच्याबद्दल बरेच काही बोलले आहे. अशा अनेक गोष्टी तिने जयबाबतीत सांगितल्या. यावेळी तिने या सगळ्यात एक मैत्रीण गमावून बसलास असे देखील खडसावून सांगितले. आणि तेव्हापासून ही गोष्ट जयच्या मनात घर करून बसली आहे. आणि त्याचे म्हणणे आहे की, काही गोष्ट मी नाही बोलू शकत तर काही गोष्टी मला बोलाव्या लागल्या. माझे दोन चेहरे नक्कीच आहेत. पण आणि बरंच काही संभाषण या दोघांमध्ये काल बघायला मिळाले. पण, या सगळ्यात स्नेहा तिच्या मतावर ठाम असल्याचे दिसून आले.

आज जय स्नेहासमोर माफी मागताना दिसणार आहे. तिच्यासमोर विनवणी करताना दिसणार आहे. त्याचा हा प्रयत्न काही संपता संपेना असं चित्र कुठेतरी आपल्याला बघायला मिळणार आहे. जयचे म्हणणे आहे, एक गोष्ट लक्षात ठेव. जे काही केलं ते खरंच मनापासून केलं. माझं काहीच intension नव्हतं तुला हर्ट करायचं, तुला खाली खेचायचे. तुला बाहेर काढण्याचं, खरंच तुला जे वाटतं आहे ना जे काही तू बोलीस… and I am sorry …

यावर स्नेहाचे म्हणणे आहे की, जर तुम्हांला वाटतं नाही तुमचं चुकलं आहे. तर सॉरी बोलून काय उपयोग आहे? स्नेहाच्या म्हणण्यानंतर सुध्दा जयने तिची माफी मागितली. स्नेहाचे म्हणणे आहे की, जय जे काही बोलला आहे ते नॅशनल टेलिव्हीजनवर आहे. जयने स्नेहाला प्रॉमिस केले, की तो तिला कधी irritate करणार नाही.

बघूया या दोघांमध्ये मैत्री पुन्हा एकदा होणार की नाही? पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT