hritik roshan-saba azad and sussanne khan-Arslan Goni 
मनोरंजन

‘एक्‍स -एक्‍स’ची स्पर्धा; ऋतिक-सबा हातात हात घालून तर मागोमाग सुजैनही बॉयफ्रेंडसोबत…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

ऋतिक रोशन त्याची मैत्रीण सबा आझादसोबत विमानतळावर दिसला. यावेळी दोघांनी एकमेकांचा हात धरला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या. पण, काही वेळानंतरi ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान आपल्या बॉयफ्रेंडसोबत हातात हात घालून दिसली. त्यामुळे कॅमेऱ्यात हे प्रसंग कैद झाले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली गेली.

ऋतिक आणि सबा विमानतळावर दिसले. दोघेही कधी एकमेकांशी बोलताना तर कधी हसताना दिसले. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर काही वेळातच ऋतिकची एक्स पत्नी सुजैन खान  बॉयफ्रेंड अर्सलान गोनीचा हात धरून विमानतळावर दिसली. समोर आलेल्या फोटोंमध्ये सुजैनने काळी शॉर्ट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. ती गोनीचा हात धरून चालत होती. मात्र, त्यांनी अद्याप त्यांच्या नात्याविषयी कुठलाही खुलासा केलेला नाही. पण, सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहून नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.

नेटकरी म्हणाले

ऋतिक आणि सबा नंतर, सुजैन आणि अर्सलानला विमानतळावर पाहून एकजण गंमतीने म्हणाला – 'काही स्पर्धा सुरू आहे का?' एकाने लिहिले – 'ऋतिक रोशन एका लहान मुलीला डेट करत आहे आणि सुजैन खानला मूल आहे.' एकाने लिहिले – X-X ची स्पर्धा चालू आहे भाऊ. आणखी एका नेटकऱ्याने लिहिलय – 'एकाच विमानतळावर एक्स कपलची स्पर्धा.. व्वा'. एकाने राग काढत लिहिलं,' काय चाललंय तिकडे, नवरा मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत फिरतोय आणि इथे एक्स बायको…'

आणखी एकाने गंमतीने लिहिले – 'मी ऋतिक आणि माजी पत्नी यांच्यातील या स्पर्धेबद्दल आणखी एकाने लिहिले की- ते एकमेकांशिवाय जगू शकतात आणि जर ते अजूनही प्रेमात असतील तर त्यांच्यापेक्षा लहान जोडीदाराला डेट करू शकतात. मत्सर करण्याऐवजी एकमेकांशी संपर्क साधा.'

वयातही मोठा फरक

सध्या ऋतिकला डेट करणारी सबा आझाद त्याच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान आहे. सुजैन विषयी बोलायचं झालं तर अर्सलान तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. काही दिवसांपूर्वी अर्सलानने सुजैनसोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते की, त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा नातेसंबंधांबद्दल बोलणे आवडत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT