Hruta Durgule travel diary  
मनोरंजन

Hruta Durgule travel diary : कलरफूल शॉर्टमध्ये हृता थायलँडच्या बीचवर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मन उडू उडू झालं' फेम आणि मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) नेहमी सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर करत असते. हृता दुर्गुळे सध्या तिचा पती प्रतीक शहासोबत थायलँडमध्ये सुटयांचा आनंद घेत आहे. तेथील फोटो हृताने ( Hruta Durgule travel diary ) सोशल मीडियावर शेअर केले आहेत हृताच्या फोटोवर चाहत्याच्या कॉमेन्टसचा पाऊस पडत आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे याचवर्षी १८ मे रोजी प्रतीकसोबत लग्न बंधनात अडकली. लग्नानंतर हे कपल हनीमूनसाठी गेले होते. यानंतर पुन्हा हे कपल आता थायलँडमध्ये पोहोचले आहे. दोघांनी थायलंडमधील फुकेट शहराला आणि फीफी बेटावर भेट दिली. यानंतर हृताने थायलँडमधील फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत हृता कधी समुद्राच्या पाण्यात तर कधी ती समुद्राच्या बीचवर हटके पोझ देताना ग्लॅमरस दिसली.

यावेळी तिने खास करून कलरफूल शार्ट ड्रेसमध्ये दिसतेय. तर कधी हृताने ब्लॅक रंगाच्या कपड्यावर जरकिन परिधान केले आहेत. यासोबत हृताने एक चष्मादेखील परिधान केलाय. याच दरम्यान हृताचा १२ सप्टेंबरला थायलँडमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तिने तीन फोटोच्या कॅप्शनमध्ये 'Until Next Time ❤️ Thank you for the experience ❤️, Love stealing Mr. Shah's clothes ?❤️, Adding a little bit of color in just another sunny day ❤️'. असे लिहिले आहे. यासोबत तिने #phuket #krabi #thailand #travel #beachvibes #island #grateful #blessed #positivevibes असे हॅसटॅगदेखील दिल्याचे पाहायला मिळतेय. हे फोटो चाहच्याच्या पसंतीस उतरले आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात 'Look at you …uffff!! ?❤️??', 'uff??', 'Loveable❤️', 'Beauty❤️?', 'Wowww ?', 'So beautiful ???', 'Slaying and how…???', 'Hot looking in this dress superb', 'Cuteness ?', 'Gorgeous ?', 'tu kiti hot dista ahe????'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकाऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत.

अभिनेत्री हृता दुर्गुळेचे नवीन 'अनन्या' आणि 'टाइमपास ३' दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. हृताने तिच्या वाढदिवसाला आगामी 'कन्नी' चित्रपटाची घोषणा केली आहे. तर ती महेश मांजरेकर यांच्या 'एका काळेचे मणी' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. हृताची छोट्या पडद्यावर 'फुलपाखरू', 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून खूपच गाजली.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT