जॅकलिन आणि सुकेशचं सुत जुळवणारी पिंकी आहे तरी कोण?

जॅकलिन आणि सुकेशचं सुत जुळवणारी पिंकी आहे तरी कोण?
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन – ठकसेन सुकेश चंद्रशेखरकडून कोटींच्या भेटवस्तू घेऊन अडचणी आलेल्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांची सध्या दिल्लीत आर्थिक गुन्‍हे विभागाकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीत पिंकी इराणी (Pinki Irani) हे नाव सतत पुढे येत आहे. पिंकी इराणी या महिलेचीही चौकशी सध्या सुरू आहे. जवळपास २०० कोटींच्या या फसवणूक प्रकरणात जॅकलिन आणि नोरा यांचं सुकेशशी नातं जुळवण्यात पिंकीचा मोठा हातभार आहे, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे.

पिंकी इराणी मूळची मुंबईची असून सुकेश आणि जॅकलिनची ओळख होण्यात तिनेच मध्यस्थी केली होती. सुकेश तुरुंगात असताना जॅकलिनसाठी भेटवस्तू खरेदी करण्याचे काम पिंकीकडे होते.

भांडण मिटवण्‍यासाठी पिंकीने सुकेशकडून घेतले १० काेटी

न्यूज १८ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॅलेंटाईन डे दिवशी जॅकलिन आणि सुकेश यांच्यात भांडण झाले होते. हे भांडण मिटवण्यासाठी पिंकीने सुकेशकडून १० कोटी रुपये घेतले होते. जॅकलिनला प्रपोज करण्यासाठी सुकेशने टिफिन या कंपनीची महागडी हिऱ्यांची अंगठी घेतली होती, तीसुद्ध पिंकीने खरेदी केली होती. काही अभिनेत्रींनी तर सुकेशची तिहार जेलमध्ये भेट घेतली होती. ही भेट घडवण्यातही पिंकीच पुढाकार घ्यायची. या सगळ्या अभिनेत्रींना महागड्या गिफ्ट देण्यात आल्या होत्या, असेही चाैकशीत स्‍पष्‍ट झाले अआहे.

EDने केलेल्या तपासात चंद्रशेखर पिंकीच्या माध्यमातून विविध अभिनेत्रींना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत होता. या सर्वच अभिनेत्रींना त्याने महागाड्या भेटवस्तू दिलेल्या आहेत. २०१५पासून सुकेशने निव्वळ अभिनेत्रींवर भेटवस्तू खरेदी करण्यासाठी २० कोटी रुपये उधळले.

अभिनेत्री जॅकलिनचा हिचा फसवणूक प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्‍यासोबतचा रोमँटिक फोटो व्‍हायरल झाला होता.
अभिनेत्री जॅकलिनचा हिचा फसवणूक प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्‍यासोबतचा रोमँटिक फोटो व्‍हायरल झाला होता.

The FirstPost या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुकेश तिहार जेलमध्ये असताना जॅकलिनला मेसेज करत होता. पण जॅकलिनने काहीच प्रतिसाद न दिल्याने सुकेशने पिंकीशी संपर्क साधला. पिंकींने त्यानंतर जॅकलिनचा मेकअप आर्टिस्ट शान याला भेटून जॅकलिनची मनधरणी केली. सुकेश हा मोठ्या कुटुंबातील आहे, अशी बतावणीही पिंकीने केली. बरीच मनधरणी केल्यानंतर जॅकलिन सुकेशशी बोलण्यास तयार झाली हाेती.

या एकूण फसवणूक प्रकरणात पिंकीला EDने ९ डिसेंबरला २०२१ अटक केली होती. पुढे फेब्रुवारी २०२२ला पटियाला हाऊस न्यायालयाने पिंकीला जामीन मंजुर केला. कोर्टात सुनावणी वेळी ॲड. आर. के. हांडू यांनी पिंकीची बाजू मांडली होती. पिंकी हिने सुकेशला गुन्हेगारी प्रकारातून पैसे गोळा करण्यासाठी मदत केली असे कुठेही म्हटलेले नाही तसेच सुकेश खर्च कत असलेला पैसा गुन्हेगारी मार्गातून आला आहे, याची माहिती पिंकीला नव्हती, असा बचाव हांडू यांनी केला होता. या प्रकरणात जॅकलिनची बुधवारी ८ तास चौकशी करण्यात आली. तर नोराला गुरुवारी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news