मनोरंजन

freida pinto: ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम फ्रिडाचे बेबीबंप फोटोशूट व्हायरल

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी ऑनलाईन : 'स्लमडॉग मिलेनियर' फेम अभिनेत्री फ्रिडा पिंटोने ( freida pinto ) लवकरच आई होणार आहे. फ्रिडा पिंटोने सध्या आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत अंडरवॉटर बेबीबंपचे फोटोशूट केले आहे.

फ्रिडा पिंटोने ( freida pinto ) अॅडव्हेंचर फोटोग्राफर कोरी ट्रॅनसोबत काही दिवसांपुर्वी साखरपुडा उरकला होता. यानंतर तिने लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज सोशल मीडियावर दिली होती. तर नुकतेच फ्रिडाने आपल्या इंन्स्टाग्रामवर अंडरवॉटर बेबीबंप प्लॉट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत फ्रिडा पांढऱ्या मोनोकोनीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटोशूट करताना फ्रिडाने बार्टन स्प्रिंग्स पूल (Barton Sprins Pool )मधील एका खडकांवर आणि पूलाच्या मध्यभागी पाण्यात उभी राहून पोझ दिली आहे. फ्रिडाच्या घरात येणाऱ्या चिमुकल्या पाहूण्याच्या स्वागताची तयारी देखील सुरू झाली आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये फ्रिडाने 'Wow!, खूपच आश्चर्यकारक अनुभवाचे वर्ष आहे, या वर्षात खूप काही नविन अनुभव येणार आहेत. यातुन मला खूपच शिकायला मिळेल. मी शांतता, नम्रता, कृतज्ञता आणि धीराने नविन येणाऱ्या अनुभवास सज्ज झाले आहे. लवकरच चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. त्यासाठी मला धीराने राहावे लागणार आहे. येणाऱ्या अनुभवासाठी माझे हृदय धडधडत आहे. यासोबत चिंता देखील वाटत आहे. असे तिने लिहिले आहे.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी वेगवेगळ्या कॉमेंन्टस करताना फ्रिडा चेहऱ्यावर आई होण्याचं तेज झळाळत असल्याचे म्हटले आहे. यावरून ती सध्या आई होण्यास सज्ज झाल्याचे चाहत्यांनी कयास लावला आहे.

याआधी फ्रिडा बेबी शॉवरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावेळी फ्रिडाने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. यासोबत तिच्या आजूबाजूला बेबीशॉवरसाठी केलेली आकर्षक सजावट दिसत होती. या फोटोसोबत तिने 'ओठी भरणे ( बेबीशॉवर ) कार्यक्रमाची आठवण नेहमी राहील, ज्यांनी माझा दिवस इतका खास बनवला त्या बहिणींना धन्यवाद' असे तिने म्हटले होते. यासोबत तिने बेबीशॉवरचे सजावट केलेल्याचे देखील आभार मानत त्यांना टॅग केले होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवणाऱ्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटातून फ्रिडा पिंटो प्रकाश झोतात आली. सोशल मीडियावर तिचा खूपच चाहता वर्ग आहे. नेहमी ती आपले फोटो आमि व्हिडिओ शोशल मीडियावर शेअर करून सक्रीय असते.

फ्रिडाने 'राइज ऑफ दि प्लॅनेट ऑफ एप्स', 'मायकल विंटरबॉटम', 'तृष्णा', 'डे ऑफ दि फाल्कन', 'इम्मोर्टल्स' यासारख्या हॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या. याशिवाय गेल्या वर्षी फ्रिडा दिग्दर्शक रॉन हॉवर्ड यांच्या अमेरिकी ड्रामा फिल्म 'हिलबिली एली'मध्ये दिसली होती.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT