जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक : कागदपत्रे गहाळ करून अर्ज बाद करण्याचा प्रयत्न : माजी आमदार वाघ | पुढारी

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक : कागदपत्रे गहाळ करून अर्ज बाद करण्याचा प्रयत्न : माजी आमदार वाघ

जळगाव; पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकसाठी अमळनेर दिका सोसायटीतून अर्ज भरलेला होता. मात्र छाननीच्या दिवशी अर्जातील सोसायटीचा ठरावाचा कागद गायब झाला. याबाबत अधिकाऱ्यांना कागद दिले असल्याचे दाखवून त्यांनी अर्जा बरोबर असल्याचे सांगून रात्री अर्ज बाद केल्याचा आरोप माजी आमदार स्मिता वाघ यांनी माध्यमांशी बोलताना केला. त्यांनी आज  निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

माजी आमदार स्मिता वाघ या अमळनेर तालुक्यातील मालपूर येथील विकास सोसायटीच्या सदस्य आहेत. त्यांनी त्या सोसायटीचा ठराव करून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र या दिवशी ठरावाचा मुख्य कागदच गायब झाला जेव्हा की संस्थेने तो ठराव करून दिलेला कागद त्यांनी अर्जासोबत जोडला होता. त्याची पीडीएफ दाखवून अधिकाऱ्यांना तो कागद पुन्हा दिला. त्यावेळेस त्यांनी तो अर्ज वैध असल्याचे सांगून, सायंकाळी तो अर्ज बाद करण्यात आल्याचे समजल्यावर आज सकाळी माजी आमदार स्मिता वाघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

माजी आमदार वाघ माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, महाविकास आघाडी फक्त भाजपला टारगेट करून ही निवडणूक विकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी यावेळी भारतीय नारायण चौधरी यांचाही अर्ज फक्त ही संस्था प्रवर्गात असल्याचे कारण सांगून तो अर्ज बाद करण्यात आल्याचे सांगितले.

अर्जावरील अभिसाक्षी स्वाक्षरीसाठी 50 हजार रुपयांची मागणीचा आरोप

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत छाननीच्या दिवशी उमेदवाराच्या अर्जावरील अभिसाक्षी स्वाक्षरीच्या ठिकाणी स्वाक्षरी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बिडवाई यांच्या मध्यस्थाने 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला. ते न दिल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला आहे. सर्व उमेदवारांच्या अर्जाच्या नकला मिळाव्यात यासाठी माधुरी अत्तरदे दाम्पत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक सुरू झाली आहे. उमेदवारांच्या अर्जांची छाननी त्यादिवशी ज्या उमेदवारांचे काही त्रुटी होत्या त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना मुभा दिली. तर या ठिकाणी महिला राखीव उमेदवार असलेल्या माधुरी अत्तरदे यांनाअभिसाक्षी स्वाक्षरीच्या ठिकाणी मागणी करूनही स्वाक्षरी करू दिली नाही. याउलट त्यांचे पती जगदीश अत्तरदे यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मध्यस्थीने 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला.

पुढे म्हणाले की, भाजपच्या तीनही महिला या ओबीसी असल्याने त्यांचे अर्ज रद्द केले. तर अभिसाक्षी स्वाक्षरी ही निवडणूक अधिकाऱ्यां समोर करायची असते त्यांची परवानगी मागीतली असता देण्यात आली नाही. मात्र बाकीच्या उमेदवारांना त्यांच्या कगदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संधी मात्र त्यांनी दिली असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचलत का?

Back to top button