मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai)' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हिना खानचा (Hina Khan) आज ३४ वा वाढदिवस आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत हिना खानने (Hina Khan) 'आदर्श बहू'ची व्यक्तीरेखा साकारली होती. सध्या हिनाने आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.
नुकतेच हिना खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊटवर काही हॉट फोटो शेअर केला आहे. या फोटोंनी हिनाच्या सौंदर्याला चार चॉद लावले आहेत.
या फोटोत हिनाने हिरवा रंगाच्या लेहेंगासोबत कानात झुमके आणि कपाळावर 'मांगटीका' घातला आहे. तर हिनाच्या हातात काही बांगड्या आणि अंगठी देखील दिसत आहे. हिनाचा या लेहेंग्यातील लूक खूपच सुंदर आहे.
याशिवाय हिनाने सॅटिन ग्रीन रंगाच्या सील्कमध्ये हटके फोटोशूट केले आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहेत. तिने या फोटोत वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. हिना पारंपारिक आणि मॉडर्न लूक दोन्हीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच कॉमेंन्टसचा पाऊस पडत आहे. यात एका युजर्सने 'आह..', 'सुंदर' आणि 'अप्रतिम', तर दुसऱ्या एका युजर्सने 'सौ लफ्ज़ लिख दू, तेरे एक दीदार पर, मुक्मल है मेरी दुनिया तेरे एक मुस्कान पर.. 'अशी हटके कॉमेंन्टस दिल्या आहेत. याशिवाय चाहत्यांनी हास्याचा आणि फायरचा ईमोजीदेखील शेअर केला आहे.
याआधी हिना आपले हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. याआधी हिनाने काळ्या रंगाच्या ड्रेस आणि साडीतील काही फोटो शेअर केले होते.
हिनाचा जन्म २ ऑक्टोबर १९८६ रोजी श्रीनगरमध्ये झाला. हिनाने दिल्लीतून एमबीए केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिनाने एअर होस्टेस कोर्ससाठी अर्ज केला होता, परंतु ती पूर्ण करू शकली नाही. यानंतर हिना अभिनय क्षेत्राकडे वळली.
यानंतर हिनाला टीव्ही शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. यानंतर हिनाने 'हैक्ड' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा पदार्पण केले आहे. याशिवाय तिला 'बिग बॉस १४', 'बिग बॉस ११' आणि 'खतरों के खिलाड़ी सीजन ८' यामध्ये पाहिले गेले होते.
हेही वाचलंत का?