हेमांगी कवी 
मनोरंजन

हेमांगी कवी म्हणते-❤ आता एकमेकांशिवाय राहू शकत नाही️

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

मराठी अभिनेत्री हेमांगी कवी या ना त्या कारणाने चर्चेत येते. ती स्पष्ट बोलणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा ती परखड वक्तव्यामुळे चर्चेत राहते. आता ती एका फेसबूक पोस्टमुळे चर्चेत आलीये. तिच्या फेसबूक पोस्टची खूप चर्चा रंगलेली दिसते.
तिने तिच्या लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट लिहिलीय. तिने फेसबूकवर एक पोस्ट लिहिलीय. हेमांगी कवी हिच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेमांगीनं लिहिलं आहे की,

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या वर्षांपासून आपल्या लग्नाला किती वर्षे झाली बोलून वर्ष मोजायची नाहीत तर प्रत्येक क्षण जगायचा! एकमेकांना सहन करत आलो वगैरे तर मुळीच म्हणणार नाही कारण आपल्याला माहितेय आपण कसे आहोत आणि काय आहोत एकमेकांसाठी आणि हे माहीत असणंच जास्त महत्वाचं आहे. आपल्या संसाराच्या सुरवातीच्या काळात माझं चिडणं तुझं कमालीचं शांत असणं, मी अति romantic तू unromantic असणं, मी अति practical तू तेवढाच emotional असणं, मी चंगुस तू खर्चिक असणं. इतक्या वर्षाच्या सहवासमुळे आपल्यातली ही विसंगती सुसंगतीत बदल्याचं श्रेय आपल्या दोघांचं! कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाही हे इतक्या वर्षात आपल्याला जमलंय, या पुढे ही जमवू तेवढा समंजसपणा दोघांना ही लाभो!

आतापर्यंत आपल्या दोघांच्याही आयुष्यात मोहाचे क्षण आले असतील, पुढे ही येतील पण तरीही त्या उपर जाऊन आपण एकमेकांना निवडलंय आणि निवडू कुठल्याही आसक्ती शिवाय यातच आपल्या प्रेमाचं, संसाराचं यश आहे. एकमेकांना जिंकल्याचं प्रतीक आहे.
एकमेकांशिवाय राहू शकत नाही ते आता… एकमेकांना सोडू शकत नाही दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! ☺️ भांडत राहू, वाईट परिस्थितीशी झगडत राहू, आनंदी राहू, समाधानी राहू! Sandeep Dhumal ❤️ #आमचामाणूस #हमाराआदमी #happyanniversary #25thdecember.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT