मनोरंजन

Hemangi Kavi : हेमांगी म्हणते, ‘जमलं तर माफ करा…’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन: अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) आपल्या बिनधास्त आणि परखड बोलण्याने नेहमीच चर्चेत असते. तर सध्या हेमांगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आपलं मत मांडताना दिसली . तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

नुकतेच अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi ) हिने फेसबूक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज (१४ एप्रिल) जयंतीनिमित्ताने तिने ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, 'मानवी हक्क आणि समाजहितासाठी संविधानात तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अंमलात आणायची आमचीच लायकी नाही! जमलं तर माफ करा बाबासाहेब!' असे म्हटले आहे.

या पोस्टसोबत तिने स्वत: मोकळ्या केसांसोबत साडीतील एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टसोबत हेमांगीने #जयभीम #jaybhim #डॉबाबासाहेबआंबेडकर #DrBabasahebAmbedkar #महामानव असा हॅशटॅगचा वापर केला आहे. हेमांगीची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक कलाकारांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात काही नेटकऱ्यांनी तिच्या परखड मतांचा आदर करत कौतुक केले.  काही नेटकऱ्यांनी तिला चांगलेच धारेवर धरले आहे. याच काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यात सुरूवात केली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले नियम नागरिक पाळत नसल्याचे तिने निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी तिने माफीही मागितल्याचे दिसून येत आहे.

याआधीही हेमांगीनं पेट्रोल दर वाढीबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने लिहिले होतो की, 'पेट्रोल दरवाढीवर लिंबू फिरवायचा होता मला पण आता…लिंबू वर पेट्रोल फिरवणार आहे!' असे म्हटले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली होती.

हेमांगीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती 'लेक माझी दुर्गा' या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस येत आहे. याशिवाय तिने 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT