Honda City Hybrid : होंडाच्या ‘या’ नव्या कारचे बुकिंग सुरू, काय आहेत फिचर्स?

Honda City Hybrid : होंडाच्या ‘या’ नव्या कारचे बुकिंग सुरू, काय आहेत फिचर्स?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील लाखो लोकांची पसंतीची आणि खास सेडान म्हणून ओळख असणारी होंडा कंपनी (Honda) आज त्यांची नवी होंडा सिटी हायब्रिड (Honda City Hybrid) कार लॉंच करणार आहे. होंडा सिटी हायब्रिडचा लुक, आकर्षक फिचर्स आणि किंमतीची माहिती आज कंपनीकडून देण्यात येणार आहे. 1.5 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिनसह इलेक्ट्रिक प्रकारात असलेली ही कार लाँच करण्यात येणार आहे. तसेच होंडा सिटी हायब्रिडच्या लुक आणि आकर्षक फिचर्सची माहितीदेखील देण्यात येणार आहे.

ही भारतीय बाजारपेठेतील पहिली मजबूत हायब्रिड मास-मार्केट कार आहे. जी सध्या भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी सज्ज आहे. आजपासून या कारचे बुकिंग सुरू करण्यात येणार आहे.

होंडा सिटी हायब्रिडचे फिचर्स

होंडा सिटी हायब्रिड आज V आणि ZX सारख्या दोन ट्रिम लेवलसह सादर करण्यात येईल. या सेडानमध्ये 0.734 kWh इतकी लिथियम आयन बॅटरी बसवलेली आहे. नवीन Honda City Hybrid e:HEV मध्ये ADAS (Advanced Driver Assistance Systems) यासह ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन, इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन-कीप असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि बरेच काही हाय-टेक वैशिष्ट्ये आहेत. सिटी हाइब्रिडला होंडाचे i-MMD हायब्रिड टेक्नॅालॅाजीसह लॅान्च करण्यात येणार आहे. याचे पेट्रोल इंजिन हे 98 bhp इतकी पॅावर आणि 127 Nm इतका टॅार्क निर्माण करेल. तसेच कारची इलेक्ट्रिक मोटर इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर (ISG) या टेक्नॅालॅाजीने सुसज्ज असणार आहे. त्याचबरोबर हे 109bhp पॅावर आणि 253 Nm टॅार्क निर्मिती करण्यास सक्षम असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार होडा सिटी हायब्रिडचे मायलेजम हे 30 kmpl पर्यंत असू शकते.

होंडा सिटी हायब्रिडची भारतातील सुरूवातीची किंमत ही 18 लाख रूपये असणार आहे. होंडा सिटी हायब्रिडच्या लुक आणि फिचर्सबद्दल सांगायचे झाले तर ही सेडान कार आतापर्यंतची सर्वात जास्त स्पोर्टी आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणार आहे. ही सेडान कार आकर्षक रिअर आणि फ्रंट बंपर सोबत ग्रिल्स देखील पहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर इंटिरिअर ऑल ब्लॅक थीम आणि डॅशबोर्ड दिसून येतील अशी ही कार आहे. ही नवी होंडा सिटी हायब्रिड ही अॅडव्हान्सड ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टिम सारख्या खूप साऱ्या आकर्षक स्टँडर्ड फिचर्ससह दिसून येईल.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news