Akshaye Khanna Viral Dance Dhurandhar  Pudhari
मनोरंजन

Akshaye Khanna Dance: अक्षय खन्नाने ‘धुरंधर’मधील धमाकेदार डान्स कुठून कॉपी केला? व्हिडिओ पाहून चाहतेही हैराण

Akshaye Khanna’s Dhurandhar Dance Goes Viral: ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाचा व्हायरल डान्स पुन्हा चर्चेत आला असून तो वडील विनोद खन्नांनी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये केलेल्या स्टेपवर आधारित असल्याचे दिसून येत आहे.

Rahul Shelke

Akshaye Khanna Viral Dance Dhurandhar Vinod Khanna: रणवीर सिंहची स्पाय-अॅक्शन फिल्म ‘धुरंधर’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. पाच दिवसांतच भारतात 150 कोटींचा आकडा गाठल्यानंतरही चित्रपटाची कमाई कमी झाली नाही, उलट वाढतच आहे. मात्र संपूर्ण चित्रपटात ज्याने सर्वाधिक छाप पाडली, तो कलाकार म्हणजे अक्षय खन्ना. रहमान डकैतच्या भूमिकेवर प्रेक्षक अक्षरशः फिदा झाले आहेत.

अक्षय खन्नाचा व्हायरल डान्स पुन्हा एकदा सोशल मीडियावर गाजू लागला आहे. रील्सचा महापूर आला आहे. पण हा डान्स अक्षयने कुठून कॉपी केला? अनेकजण म्हणत आहेत की, हा डान्स त्याने वडील विनोद खन्ना यांच्याकडूनच त्याने कॉपी केली आहे. ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने जो आयकॉनिक डान्स केला, तो कोरिओग्राफ केलेला नव्हता. शूटदरम्यान अचानक त्याने डान्स केला आणि आज तो सर्वात जास्त व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर सध्या 1989 मधील एक जुना व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्ये झालेल्या एका चॅरिटी कॉन्सर्टचा हा व्हिडिओ असून यात विनोद खन्ना ब्लॅक कोटमध्ये अगदी तसाच डान्स करताना दिसत आहेत. आणि हे पाहताच प्रेक्षकांना ‘धुरंधर’मधील रहमान डकैतचा डान्स आठवतो.

1989 चा लाहोर कॉन्सर्ट

हा जुना व्हिडिओ 1989 मधील लाहोरमधील चॅरिटी इव्हेंटचा असून त्यात विनोद खन्नासोबत अभिनेत्री रेखा, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान, तसेच दिग्गज क्रिकेटर जावेद मियांदाद हे सर्वजण डान्स करताना दिसत आहेत. त्या कार्यक्रमातीलच हा आयकॉनिक डान्स पुन्हा चर्चेत आला आहे, कारण अक्षयने अगदी तसाच डान्स केला आहे. यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं की, “यार, अक्षयने तर वडिलांची आठवण करून दिली!”

अक्षयची एन्ट्री आणि ‘FA9LA’ गाणं पुन्हा ट्रेंडमध्ये

‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाची एन्ट्री ज्या गाण्यावर दाखवण्यात आली आहे ते गाणं FA9LA, गल्फ-बेस्ड हिप-हॉप आर्टिस्ट फ्लिपराची यांनी गायलं आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर हे गाणं आणि अक्षयचा एन्ट्री डान्स पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT