मनोरंजन

Shama Sikander : शमा सिकंदर अडकली लग्नबंधनात (photos)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री शमा सिकंदर ( Shama Sikander) दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर विवाहबंधनात अडकली आहे. शमाने काल (सोमवारी , दि. १४ मार्च) रोजी बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉन लग्न केले. या जोडप्याने गोव्यात मोजकेच कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाहाचे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

शमा सिकंदरने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर बॉयफ्रेंड जेम्स मिलिरॉनशी केलेल्या विवाहाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत समाने पांढऱ्या रंगाचा वेडिंग ड्रेस तर जेम्सने पांढऱ्या रंगाचा कोट सूटमध्ये दिसत आहे. या लूकमध्ये हे कपल खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होते. या फोटोच्या कॅप्शनमध्ये समाने 'WHOLE.. ???' असे लिहिले आहे.

शेअर केलेल्या एका फोटोत शमा सिकंदर आणि जेम्स मिलिरॉन हटके पोज देताना दिसतात. तर दुसऱ्या एका फोटोत दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत आहेत. तर यावेळी जेम्सने नववधूला किस देखील केले आहे. समाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी मिनिमल मेकअपसोबत डायमंडचे एयररिंग्स आणि मेसी बन देखील परिधान केले आहे.

याआधी समाने ( Shama Sikander) प्री-वेडिंगचे काही फोटो शेअर केले होते. यावेळी तिने गोल्डन रंगाच्या लेहेंगामध्ये ती खूपच क्यूट दिसत होती. याशिवाय ती सोशल मीडियावर सक्रिय असून आपले फोटो शेअर करत असते.

शमा आणि जेम्सने २०१५ मध्ये साखरपुडा केला होता. यानंतर अनेक दिवसांपासून कुटूंबिय लग्नाची योजना आखत होते. परंतु, मध्यंतरी कोरोना संसर्गाचा पादुर्भाव वाढत गेल्याने विवाह थांबवावा लागल्याचे तिने एका मुलाखतीत तिने सांगितले आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT