पुढारी ऑनलाईन
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या साप्ताहिक कार्य सुरू आहे. ज्यामध्ये घरामध्ये हुकूमशहांचे राज्य आहे. आणि त्यामध्ये सदस्य वेगवेगळे टास्क पूर्ण करत आहेत. ज्यामध्ये त्यांना बर्याच आव्हांनाना सामोरे जावे लागते आहे; पण आज मात्र बिग बॉस मराठीचे घर भाऊक झाले ते उत्कर्ष याने सादर केलेल्या कवितेने. उत्कर्ष याने शेतकरी कविता सादर केली.
तो म्हणाला, महाराष्ट्राच्या सर्व जनतेसाठी आणि मुख्यत: शेतकर्यांसाठी जे मला आता सुचतं आहे ते सादर करत आहे. शेतकरी राजा घेतोया गळफास, सांगा कोण देईल त्याच्या पिला घास. दिसरात राबुनी जीव त्याचा जातो. कोण एक सांगा जो त्याची बाजू घेतो. सांगा कधी संपेल त्याचा वनवास.सांगा कोण देईल त्याच्या पिला घास. आदिश, गायत्री, विशाल यांना कविता सुरू असताना अश्रु अनावर झाले.
अजून घरामध्ये काय घडले बघा आजच्या भागामध्ये. . पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.
हेही वाचलं का?