पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या (BBM -4 ) घरामध्ये आज जोरदार चर्चा सुरु आहे. आता ही चर्चा आहे की तक्रार आजच्या भागामध्ये कळेलच. पण त्यांच्या संभाषणावरून तर त्या तक्रार करत आहेत असेच दिसून येत आहे. एकीकडे तेजस्विनी आणि अमृता धोंगडे तर दुसरीकडे समृद्धी आणि स्नेहलता. तेजस्विनीचे म्हणणे आहे, रुचिरा दोन्हीकडे खेळते तू बघ. ती दोन्ही कडून खेळते… तिला तिथे पण खुश करायचे आहे. तिला इथे पण खुश करायचे आहे. मला पटत आहे तू काय म्हणतेस पण तूच सांग अमृता देशमुखचा निकष. अमृता देशमुख पण दोन्हीकडून खेळते. एकतर ती बोलायला लागली की थांबत नाही. (BBM -4 )
दुसरीकडे समृद्धी स्नेहलताशी बोलताना दिसणार आहे, आता जर मला माझ्या परफॉर्मन्स नंतर जेव्हा माझं नावं घेतलं जात स्ट्रॉंग परफॉर्मर वैगरे आणि मग जर कोणी मला माझ्या परफॉर्मन्सवरून बोलना तर मग मी लेफ्ट राईट सेंटर बोलू शकते. पण ज तुम्हांला स्वतःला पण माहिती आहे, तुम्ही स्वीकारता देखील मी टिकू शकले असते, पण मी उठले लवकर मग नंतर जे argument होतं ना कसं का? तिथे चुकता तुम्ही… आता स्नेहलता आणि समृद्धी कोणाविषयी बोलत आहेत कळलेच आजच्या भागामध्ये.