पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठी ३ तिसऱ्या सीझनमध्ये पहिल्या दिवशी फुल्ला राडा झालेला दिसतोय. बिग बॉस मराठी ३ च्या घरात १५ कलाकारांची ग्रॅण्ड एन्ट्री झालीय. पण, असा स्पर्धकांनी जो असा काही गोंधळ घातलाय. तो राडा पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.
अभिनेत्री मीरा जगन्नाथ आणि 'स्पिलिट्सविला' फेम जय दुधाने भिडले. त्यानंतर जो राडा झालाय, तो तुम्ही व्हिडिओमध्येचं पाहा. मीरा व जय यांच्यातील वाद विकोपाला गेला. पहिल्याचं दिवशाची सुरुवात भांडणाने झाली. तेही एका टॉवेलमुळे. कलाकारंची घरात एन्ट्री झाली. पहिल्या आठवड्यासाठी बिग बॉसमधील प्रत्येक स्पर्धकाला विशेष अधिकार देण्यात आले.
या आठवड्यासाठी मीराला बेडरूमचा अधिकार देण्यात आलाय. बेडरूमची स्वछता, बेडरूमचे हक्क मीराकडे आहेत. त्यामुळे मीराचे लक्ष संगळीकडे आहे. तिने अधिकार मिळताच बेडरूम एरियाचा ताबा स्वत:कडे घेतला.
ती प्रत्येकाला स्वत:चं साहित्य जागेवर ठेवण्याचा आदेश देत होती. पण, जयने नियम पाळले नाहीत. त्याने टॉवेल त्याच्या बेडवर टाकला होता. तो मीराला दिसल्यानंतर ती चांगलीचं भडकली. मीराने जयला आदेश दिला की, बेडवरचा ओला टॉवेल उचलून ठेव.
त्यावर जयने तो टॉवेल ओला नसल्याचं सांगितलं. पण, मीराने आपल्या अधिकाराचा पुरेपूर वापर केला. तिने तो टॉवेल जयला पुन्हा पलंगात ठेवायला लावला. जयने टॉवेल उचलला. पण, जय हातवारे करत तिला बिनडोक म्हटल्याचा दावा केला.
मीराने हे पाहिल्यानंतर तिनं अख्ख घर डोक्यावर घेतलं. दोघांमध्ये चांगलाचं वाद झाला. घरातील सदस्यांनी मध्यस्थी केली. त्यांचा वाद थांबवण्याचा प्रयतिन केला. पण, दोघेही आपल्या मतावर ठाम. मग काय, जयने स्पष्टीकरण दिलं की, त्याने अजून आंघोळ केलेली नाही. मग टॉवेल ओला कसा असेल. अंघोळ करायच्या आधी तो टॉवेल बाथरूम एरियात का टाकून देऊ? असा प्रश्न त्याने विचारला.
जय आणि मीराचा वाद पाहून सदस्यांनी अखेर मध्यस्थी केली. त्यांचा वाद सोडवला. पण, पहिल्याचं दिवशी घरीतील ही परिस्थिती पाहून आता पुढचे १०० दिवस कसे असणार आहेत, याची कल्पना न केलेली बरी.
हेही वाचलं का?