apurva nemalekar  
मनोरंजन

Apurva Nemlekar : आईला पाहताच अपूर्वाला कोसळलं रडू (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : रात्रीस खेळ चाले फेम शेवंता अर्थातचं अपूर्वा नेमळेकरच्या (Apurva Nemlekar) आईने बिग बॉस मराठी सीझन ४ च्या घरात एन्ट्री घेतलीय. अपूर्वाने आपल्या आईचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय-'जोवर आई आहे, तोवर अंगाई आहे, जोवर मामा आहे, तोवर चांदोबा आहे, पुन्हा एकदा लाड पुरवून घेण्यासाठी ही माणसे हवीच हवी. Thank you Big Boss. (Apurva Nemlekar)

अपूर्वाच्या आईने घरात एन्ट्री घेताचं अपूर्वा भावूक झाली. आईला पाहताच तिला रडू कोसळलं. आईने अपूर्वाला खूप माया केली. अपूर्वानेही आईला मिठी मारत तिची विचारपूस केली. डोळ्यातील अश्रू पाहून आईने तिला मी परत जाईन, असा प्रेमळ इशारा दिला. दुसरीकडे अपूर्वाचा आनंद गगनात मावेना. खूप महिन्यांनंतर, आईला भेटल्यानंतर तिला खूप काही बोलायचं होतं. तुम्ही अपूर्वाचा हा व्हिडिओ पाहू शकता.

जेव्हा अपूर्वाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली होती तेव्हा महेश मांजरेकरांनी तिचं स्वागत केलं होतं. तिला प्रश्न विचारला होता की, बिग बॉसच्या घरात तुला कुणाला घेऊन जायला आवडेल. त्यावर अपूर्वाने उत्तर दिले होते की, माझे मित्र-मैत्रीण कमी आहेत. त्यामुळे घरात कोणाला न्यायचे असेल तर मी माझ्या आईला घेऊन जाईन. तिच माझी मैत्रीण आहे. मी या स्पर्धेत भाग घेणार, हे तिला मान्य नव्हते कारण तिचे काही विचार होते. तिने पुढे सांगितले की, मी आईच्या खूप जवळ आहे.

आणि याप्रमाणेच ती आपल्या आईला घेऊन घरात आली. तिने आपल्या भावनादेखील आईसमोर व्यक्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT