ग्रामपंचायत रणांगण निकाल : ‘शाहूवाडी’त शिवसेना-राष्ट्रवादीचे वर्चस्व

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election

बांबवडे : पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यात नुकत्याच संपन्न झालेल्या 43 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व बिनविरोध झालेल्या 5 ग्रमपंचायतींच्या सदस्य निवडीत राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतली. त्या पाठोपाठ जनसुराज्य-काँग्रेसनेही चांगलीच मजल मारली. स्थानिक अघाड्यांनीही अपेक्षित यश प्राप्त झाले आहे.

तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवत सदस्य व सरपंच निवडीत सेना राष्ट्रवादीने वर्चस्व प्राप्त केले. जनसुराज्य-काँग्रेस आघाडीनेही 19 ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण केले. शाहूवाडी तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक चालते. तालुक्याच्या गावागावातील कार्यकर्ता पक्षापेक्षा गटाचा कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे. झालेल्या निवडणुका पक्षापेक्षा गटातटाने लढवल्या गेल्या. शाहूवाडी तालुक्यात माजी आमदार सत्यजित पाटील यांचा शिवसेना, मानसिंगराव गायकवाड यांचा राष्ट्रवादी, आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य, गोकुळ संचालक कर्णसिंह गायकवाड यांचा काँग्रेस गट असे पक्षीय गट कार्यरत आहेत. परंतु ग्रामपंचायत निवडणुका या गट व आघाडीत लढवल्या गेल्या. तालुक्यात सरूडकर व मानसिंगराव गायकवाड अशी व आमदार कोरे व कर्णसिंह गायकवाड अशी आघाडी आहे. तरीही काही गावात स्थानिक आघाडी तयार झाल्या होत्या.

अन् नेत्यांचे फोटो एकाच बॅनरवर

तालुका पातळीवरील एकमेकांचे विरोधक असलेले आमदार विनय कोरे व माजी आमदार सत्यजित पाटील, मानसिंगराव गायकवाड, कर्णसिंह गायकवाड या नेत्यांचे फोटो एकाच बॅनरवर दिसून आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news