मनोरंजन

अभिनेता अमित साधच्या “मैं” चित्रपटाचे मुंबईत शूट, पहिली झलक पाहा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पहिले शेड्यूल पूर्ण केल्यानंतर गेल्या वर्षी अभिनेता अमित साधने नुकतेच यूवी फिल्म्सच्या " मैं " चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग मुंबईत सुरू केले आहे. आउटडोअर शूटच्या दरम्यानची एक खास झलक त्याने शेअर केली आहे.

गेल्या महिन्यात सुट्टी घेऊन अभिनेता अमित साध पुन्हा परतलाय. तो आता एका पोलिसाच्या पात्रात परत येण्यासाठी उत्सुक आहे.
"मैं " हा एक कॉप ड्रामा आहे, जो सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. ज्यामुळे अमितने लगेचच या प्रोजेक्टला हो म्हटलं आहे.

अमितसोबत ईशा देओल तख्तानी, सीमा बिस्वास, तिग्मांशु धुलिया आणि मिलिंद गुणाजी सारख्या कलाकारांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित चित्रपट निर्माते सचिन सराफ यांनी केले आहे.

'ब्रीद' मधील बौद्धिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याच्या आणि त्याच्या 'घुसपैठ' या लघुपटातील फोटो पत्रकाराच्या भूमिकेने सर्वांना थक्क करून सोडलेले, चाहते अमितला "मैं" मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT