मनोरंजन

Priyanka Chopra : प्रियांकाने फोटोग्राफर्सनी काढलेले फोटो विकले, अमेरिकन टिकटॉकरचा आरोप

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने फोटोग्राफर्सनी काढलेले फोटो विकले, असा आरोप एका अमेरिकन टिकटॉकरने केला आहे. (Priyanka Chopra) प्रियांकाने तिचे स्वत:चे फोटो न्यूज पोर्टलवर प्रकाशित होण्यासाठी विक्री केल्याचे तिने म्हटले आहे. पती निक जोन्सचेही न्यू जर्सीमधील ख्रिसमस खरेदीपासूनचे फोटो तिने विकले आहेत. पण, Reddit वर टिकटॉकरचा व्हिडिओ समोर येताच अभिनेत्री प्रियांका चोप्राचे चाहते तिच्या बचावासाठी उभे राहिले. (Priyanka Chopra)

नेटिझन्स काय म्हणाले पहा –

'पॅप वॉक हे काही नवीन नाही. परंतु, या महिलेने विश्वास ठेवावा. अशी अपेक्षा आहे की, करोडपती पीसीला तिचे पॅप फोटो विकून पैसे हवे आहेत, मला कटुता आणि वर्णद्वेष जाणवतो. आणि फेक न्यूज', 'अहो, एका सावळ्या महिलेने फोटो विकून (ती श्रीमंत असूनही) कसे पैसे कमावले याबद्दल एका गोर्‍या महिलेने टिकटॉक बनवणे किती महत्त्वाचे होते ते मी पाहतो आहे.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT