पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : जमिनीवर अतिक्रमण करणार्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटनारी (दि. 20) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रावेत गावठाण येथे घडली. पुंडलिक नागू पालेकर (76, रा. सिंधुनगर, प्राधिकरण) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण विठ्ठल खानेकर, प्रकाश विठ्ठल खानेकर, एक महिला (सर्व रा. डांगे चौक, थेरगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पालेकर आणि त्यांचे सहकारी भुजंगराव शंकरराव खेनट हे रावेत गावठाण येथील त्यांच्या संस्थेच्या जागेत थांबले होते. त्या वेळी आरोपींनी पत्र्याच्या शेडला जोरात धक्का देऊन नुकसान केले. तसेच, फिर्यादी यांना शिवीगाळ करीत त्यांची गचांडी पकडली. त्यानंतर फिर्यादी यांचे सहकारी खेनट यांनाही शिवीगाळ करून जमिनीवर अतिक्रमण करून ताबा घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रावेत पोलिस तपास करीत आहेत.