Aishwarya Rai viral video: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मिस वर्ल्ड आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन या केवळ त्यांच्या सौंदर्यासाठी नाही तर त्यांच्या नम्र वागणूकीसाठीही प्रसिद्ध आहेत. म्हणूनच त्या जिथेही जातात, तिथे चर्चेचा विषय बनतात. आता पुन्हा एकदा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथे आध्यात्मिक गुरू श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच सोहळ्यात ऐश्वर्या राय बच्चन यांनीही हजेरी लावली होती.
ऐश्वर्यांनी कार्यक्रमात संस्कार, अध्यात्म आणि मानवतेचे महत्त्व यावर सुंदर भाषण केले.
त्यांचे बोलणे ऐकून उपस्थित प्रेक्षकांनीही टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. भाषण संपल्यानंतर ऐश्वर्या थेट पीएम मोदींकडे गेल्या आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून अभिवादन केले. मोदी यांनीही स्मितहास्य करत त्यांना आशीर्वाद दिला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या नम्रतेचे मनापासून कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, “मिस वर्ल्ड असूनही इतकी साधेपणा? यालाच म्हणतात संस्कार!” दुसऱ्याने कमेंट केली की, “भारतीय संस्कृती जगभर प्रसिद्ध करणाऱ्या ऐश्वर्या रायला सलाम.” तर आणखी एकाने लिहिले की, “ऐश्वर्या Grounded आहे म्हणूनच आजही लोकांच्या मनात आहे. ती फक्त सुंदर नाही, ती संस्कारही आहे!” काहींनी तर हा व्हिडिओ "इंडियन कल्चरचा प्राउड मोमेंट" म्हणत शेअर केला आहे.
अलिकडेच ऐश्वर्या राय यांनी पॅरिस फॅशन वीकमध्ये स्टायलिश वॉक करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आणि आता पुट्टपर्थीमध्ये त्यांच्या कृतीने मनं जिंकली आहेत. एखाद्या कलाकारात ग्लॅमर आणि नम्रता हे दोन्ही असणे किती सुंदर दिसू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन.