Jaya Bachchan-Aishwarya Rai relation | कधी प्रेम तर कधी ट्रोलिंगचा सामना! सासू-सुनेच्या या नात्यामागचं सत्य काय?

Jaya Bachchan-Aishwarya Rai relation | ऐश्वर्याचे सासूशी कसं आहे नातं? जया बच्चन यांना कधी प्रेम तर कधी ट्रोलिंगला जावं लागलं सामोरं!
image of bachchan family
Jaya Bachchan-Aishwarya Rai Bonding Instagram
Published on
Updated on

Jaya Bachchan-Aishwarya Rai Bachchan relation

मुंबई - बच्चन कुटुंब म्हणजे बॉलिवूडचं राजघराणं. या कुटुंबातली दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची सासू जया बच्चन. दोघींचं नातं अनेकदा चर्चेत आलं आहे. कधी प्रेमळ क्षणांमुळे, तर कधी सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगमुळे.

जया बच्चन आणि त्यांची सून, अभिनेत्री ऐश्वर्या एकत्र क्वचितच दिसतात. त्यामुळे अफवा पसरत राहतात की, सासू-सुनेमध्ये पटत नाही. जया बच्चन यांनी अनेकदा दोघींच्या नात्याबद्दल बातचीत केलीय. अखेर सासू-सुनेचं नातं कसं आहे?

image of bachchan family
Sanjay Mishra Mahima Chaudhry Marriage | ६२ वर्षीय संजय मिश्रा यांनी महिमा चौधरी सोबत केले लग्न? नेमकं गौडबंगाल काय?

ऐश्वर्या रायने २००७ साली अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि बच्चन परिवाराची सून झाली. सुरुवातीला जया बच्चन आणि ऐश्वर्याचं नातं अतिशय जवळचं असल्याचं म्हटलं जात होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघी एकत्र दिसायच्या, आणि जया बच्चन ऐश्वर्याचं कौतुक करताना दिसायच्या.

image of bachchan family
Love and War clash Toxic | रणबीरच्या 'लव्ह अँड वॉर'शी क्लॅश होणार 'टॉक्सिक'? आलियाच्या नव्या चित्रपटाची रिलीज डेट बदलली

तथापि, काही वर्षांत दोघींमधील सार्वजनिक वागणुकीमुळे नेटकऱ्यांनी वेगवेगळे अर्थ लावले. काही इव्हेंट्समध्ये जया बच्चन यांचा कठोर स्वभाव आणि ऐश्वर्याची शांत प्रतिक्रिया यावरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. काहींनी या नात्याला “थोडंसं तणावग्रस्त” म्हटलं, तर काहींनी “आई-मुलीचं नातं” म्हणून त्याचं समर्थन केलं.

अभिषेक बच्चन मात्र नेहमीच दोघींच्या नात्याबद्दल सकारात्मक बोलताना दिसतो. तो म्हणतो, “आई आणि ऐश्वर्याचं नातं अतिशय आदराचं आहे. दोघी एकमेकांशी मनमोकळं बोलतात आणि एकमेकांचा खूप सन्मान करतात.”

जया बच्चन यांनी सांगितलं होतं की, सून ऐश्वर्या राय सोबत त्यांचे बॉन्डिंग कसे आहे. एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जया यांनी ऐश्वर्या रायसोबतच्या आपल्या नात्याचा खुलासा केला. त्यांनी तिला आपली मैत्रीण असल्याचं म्हटलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, "ऐश्वर्या माझी मैत्रीण आहे. जर मला तिची कुठलीही गोष्ट आवडली नाही तप मी तिला तोंडावर बोलते. तिच्या मागे कुठलेही राजकारण करत नाही. जर ती माझ्या मताशी असहमत असेल तर ती स्वत:ला जाहिर करते. फरक इतकाच असतो की, मी थोडी अधिक ड्रामॅटिक होऊ शकते आणि तिला अधिक रिस्पेक्टफुल व्हावं लागेल. मी म्हातारी आहे, तुम्ही जाणता. बस इतकचं."

ऐश्वर्या सोबत जया बच्चन स्ट्रिक्ट आहे?

जेव्हा फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसलाने एका मुलाखतीत जया बच्चन यांच्याशी विचारलं होतं की, काय ती आपल्या सुनेसाठी स्ट्रिक्ट आहे. यावर त्यांनी म्हटलं होतं की, "कडक? ती माझी मुलगी नाही! ती माझी सून आहे. मला तिच्यासोबत सक्तीने वागायला हवं? मला विश्वास आहे की, तिच्या आईने तिच्यासाठी असे केले आहे. एक मुलगी आणि सुनेच्या मध्ये अंतर आहे, तुम्ही जाणता. माझा अर्थ आहे की, मला माहिती नाही का, पण तुम्हाला वाटत नाही का, आपल्या आई-वडिलांचा सन्मान करण्याची गरज आहे. एका मुलगीच्या रुपात तुम्ही तुमच्या आई-वडिलांना हल्क्यात घेता. आपल्या सासरच्या लोकांसोबत, तुम्ही असे करू शकत नाही."

नेटकऱ्यांनी आपली सहमती जाहीर देखील केली आहे. तर काही लोकांचे म्हणणे आहे की, ''त्यांनी कधीही ॲशला मुलगी मानले नाही. एका युजरने लिहिलं, सर्व सासू अशाच असतात, मग त्या सेलिब्रिटीही असू देत.''

अमिताभ बच्चन आपल्या सुनेबद्दल काय म्हणतात?

'कॉफी विथ करण'मध्ये बोलताना जया बच्चन यांनी सांगितलं होतं की, अमिताभ बच्चन आपल्या सुनेबद्दल त्यांना काय वाटतं? त्या म्हणाल्या होत्या , "अमितजी, जसे ॲशला पाहतात, त्यांना वाटतं की, श्वेता घरात येत आहे. त्यांना खूप छान वाटतं. श्वेता लग्न होऊन गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी ऐश्वर्या भरून काढेल. आम्ही कधीही ॲडजस्ट करू शकलो नाही की, श्वेता परिवारात नाही. ती बाहेर आहे आणि ती बच्चन नाही. हे मान्य करणं आता कठीण आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news