

Aishwarya Rai-Abhishek Bachchan case against YouTube 4 crore rupees alleged AI videos
मुंबई - ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी युट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगलविरुद्ध ४ कोटी रुपये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने तथाकथित एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओ प्रकरणावरून यु-ट्यूब आणि गुगल विरोधात कायदेशीर पाऊल उचलले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी गूगल आणि दुसऱ्या कंपनींकडून चार कोटींची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तसेच असा प्रकार रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपायांची मागणी केली आहे. या खटल्यात ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी अनेक लिंक्स, स्क्रिनशॉट्स समाविष्ट केले आहेत. या कपलचा आरोप आहे की, "लैंगिकदृष्ट्या स्पष्ट" किंवा "काल्पनिक" एआय कंटेंट दाखवत आहे. त्यांचा असा युक्तिवाद आहे की, YouTube चा कंटेंट आणि ठर्ड पार्टी ट्रेनिंग पॉलिसीज चिंताजनक आहेत.
६ सप्टेंबर रोजी दाखल केलेल्या याचिकेत कपलचे बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन करणारे व्हिडिओ काढून टाकण्याची आणि कायमची बंदी घालण्याची विनंती करण्यात आली आहे. कंटेंट निर्मितीमध्ये एआयच्या गैरवापर होत असून युट्यूबला प्रतिस्पर्धी एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचे व्हिडिओ वापरण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना लागू करण्याचे निर्देश देण्याची विनंती कोर्टाला केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटलंय- सध्याच्या प्लॅटफॉर्म धोरणांमुळे एआय तंत्रज्ञान विकसित होत असताना आणखी गैरवापर होऊ शकतो.
या कपलने एआय बॉलीवूड इश्क या यूट्यूब चॅनेलचा उल्लेख केला, ज्याचे २५९ हून अधिक व्हिडिओ आहेत ज्यात बनावट क्लिप्स आहेत आणि १६.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एका मोठ्या प्रमाणात पाहिलेल्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान एका स्विमिंग पूलमध्ये असल्याचे दाखवले आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चनला विचित्र दृश्यांमध्ये दाखवण्यात आले आहे.