Aditi Sharma Domestic Violence pudhari
मनोरंजन

Aditi Sharma Domestic Violence: मारहाण, संशय अन् सोनंही बळकावलं! प्रसिद्ध अभिनेत्री आदिती शर्माकडून पतीसह सासरच्यांवर एफआयआर

Anirudha Sankpal

Actress Aditi Sharma Domestic Violence: टीव्ही अभिनेत्री आदिती शर्माने तिचा पती अभिनीत कौशिक आणि त्याच्या कुटुंबियांवर कौटुंबिक हिंसाचार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने सासरच्या मंडळींकडून मारहाण, शाब्दिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत पतीपासून वेगळं झाल्यावर २ वर्षांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर आता मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

मुंबईच्या गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत आदिती शर्माने तिचा पती अभिनीत कौशिक, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद किर्ती कौशिक यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

आयएएनएसने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'अभिनेत्री आदिती शर्माच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी त्यांचे पती अभिनीत विद्यानंद कौशिक, सासू उर्मिला कौशिक आणि नणंद किर्ती कौशिक यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. तक्रारीत आदितीने त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर दागिन्यांचा देखील कथित गैरवापर करून त्यावर कब्जा केल्याचा आरोप केला आहे.'

लग्नानंतर लगेचच छळाला सुरूवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तक्रारीत ज्या घटनांचा उल्लेख केला गेला आहे. त्या घटना १२ नोव्हेंबर २०२४ पासून ९ मार्च २०२५ च्या दरम्यान गोरेगावमधील त्यांच्या घरी घडल्या. तक्रार दाखल झाल्यानंतर सर्व आरोपांची तपासणी होणार आहे.'

आदिती शर्माने तक्रारीत दावा केला आहे की लग्नानंतर काही काळानंतर तिला छळाचा सामना करावा लागला. दिवसेंदिवस ही समस्या वाढू लागली. अभिनेत्रीने आपल्या पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले.

आई वडिलांशी बोलण्यावर बंधन

आदितीने सांगितलं की तिला सतत मानसिक दबावात ठेवण्यात आलं. शारीरिक त्रास देण्यात आला. तिच्यासोबत मारहाण केली अन् दागिने स्वतःच्या ताब्यात ठेवले. घरखर्चासाठी पती तिच्याकडून पैसे घेत होता. तो तिच्यावर शंका देखील घेत होता. तिचा मोबाईल सतत चेक करत होता. तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला जात होता. तसेच तिला तिच्या आई वडिलांशी बोलण्यावर देखील बंधने घातली जात होती.

कधी झालं होतं लग्न

आदिती शर्माचे २०२४ मध्ये लग्न झाले होते. अभिनीत कौशिक यांनी १२ नोव्हेंबरला गोरेगावमधील आपल्या घरी वैयक्तिकस्वरूपात लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या ४ महिन्यानंतरच दोघेही वेगळे राहू लागले होते. अभिनेत्रीने सांगितलं की नोव्हेंबर २०२४ पासूनच अभिनीत तिच्यासोबत हिंसा करत होता अन् तिचा छळ करत होता.

आदिती शर्मा आणि अभिनीत कौशिक यांची ओळख जून २०२१ मध्ये एका व्हर्च्युअल वर्कशॉपमध्ये झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये जवळीकता वाढली. त्यानंतर त्यांच्या नात्याचे रूपांतर प्रमात झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT