मनोरंजन

Farhan Akhtar : फरहान अख्तरने साजरी केली शिबानीसाेबत दिवाळी

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन: अभिनेता फरहान अख्तरने ( Farhan Akhtar ) आपली गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत दिवाळी साजरी केली. यातील विशेष म्हणजे, फरहानसोबत गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर पुजेला बसली. हा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

नुकतेच फरहानने स्वत: आपल्या इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत फरहानच्या ( Farhan Akhtar ) ऑफिसमध्ये दिवाळी धामधुम दिसत आहे. फरहान आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानीसह अभिनेता रितेश सिधवानी दिवाळीची पुजेत सहभागी झाल्याचे दिसत आहेत. यावेळी फरहानने निळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची पॅट तर शिबानीने गडद हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

गर्लफ्रेंड शिबानी देखील पुजेच्या वेळी फरहानच्या शेजारी बसलेली दिसत आहे. यातील खास म्हणजे, फरहान शिबानीला टिका लावताना दिसत आहेत.  हा फोटो शेअर करताना फरहानने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत हास्याचा इमोजी शेअर केला आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्सदेखील कॉमेंन्टस पाउस पाडत आहेत. फरहानच्या या फोटोवर कॉमेंन्टस करताना बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने प्रेमाची ईमोजी शेअर केला आहे.

याशिवाय शिबानीने देखील आपल्या इंन्स्टाग्रामवर हाच फोटो शेअर करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने "मिठाई, आठवणी आणि आनंदानी भरलेल्या सण, दिवाळीच्या शुभेच्छा." असे लिहिले आहे. या फोटोवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

फरहान अख्तर नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असताे.  शिबानीच्या वाढदिवसा निमित्ताने दोघांचा 'ब्लॅक अँड व्हाईट' एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी "माझ्या मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा शु. लव्ह यू." असे लिहिले होते. यावरून दोघांच्यात अफेअरची चर्चांनी उधाण आले हाेते.

याशिवाय फरहानने अलीकडेच मुलगी शाक्य हिच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटोही शेअर केला आहे. हा फोटो लंडनमधील सुमारे २० वर्षापुर्वीच्या जुना आहे, फोटोमध्ये तरुण फरहान शाक्यसोबत लंडनच्या रस्त्यावर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्सनमध्ये "पीक-ए-बू, लंडन डायरीज 2002" असे लिहिले आहे. फरहान आणि शिबानी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. याशिवाय फरहाने आपल्या मानेवर टॅटू काढतानाच एक व्हिडिओ शेअर केला होता.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास फरहान शेवटचा राकेश ओमप्रकाश मेहरा याच्या 'तुफान' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात परेश रावल आणि मृणाल ठाकूर यांच्याही भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच त्याने त्याच्या आगामी 'जी ले जरा' या दिग्दर्शनाची घोषणा केली होती. यात अभिनेत्री आलिया भट्ट, कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT