Abhijeet Dipke Vs Samay Raina pudhari
मनोरंजन

Abhijeet Dipke Vs Samay Raina: श्रीमंत होतास म्हणून वाचलास... समयला 'प्रिव्हिलेज्ड' म्हणताच अभिजीतला नेटकऱ्यांनी घेरलं

Anirudha Sankpal

Abhijeet Dipke Vs Samay Raina: कॉक्रोच जनता पार्टीचा फाऊंडर अभिजीत दिपकेने नुकतेच समदीशच्या युट्यूब चॅननला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने स्टँड अप कॉमेडियन समय रैनाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. अभिजीत दिपकेने समय रैनाला श्रीमंत म्हणत तू श्रीमंत (प्रिव्हिलेज्ड) होतास म्हणून बाहेर पडू शकलास असं म्हटलं होतं.

अनफिल्टर्ड बाय समदीश या युट्यूब चॅनलला कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके याला जर तुला इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये बोलवलं तर मजा येणार नाही का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अभिजीतने त्वरित हे नाकारलं. तो म्हणाला, 'मी इंडियाज गॉट लेटेंटमध्ये जाणार नाही. आम्ही का लढतोय आम्ही एक सोपा रस्ता निवडून बाहेर पडलो असतो ना. तो समय रैनाला उद्येशून म्हणाला की तू श्रीमंत होतास प्रिव्हिलेज होतास म्हणून बाहेर पडू शकलास.'

अभिजीत दिपकेच्या या वक्तव्यावर इंटरनेटवर समिश्र प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी अभिजीतच्या मताशी सहमती दर्शवली तर अनेकांनी समय रैना याला श्रीमंत म्हणणे योग्य नाही. तू स्वतःकडे पाहा असं म्हटलं. एका युजरने तू युएसएमध्ये होतास ही श्रीमंती नाही का? तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने प्रिव्हिलेज्ड?? हा व्यक्ती बॉस्टन विद्यापीठातून शिकला आहे. त्यामुळं प्रत्येकाला प्रिव्हिलेज्डचं लेक्चर देणं बंद करा. अजून एका नेटकऱ्याने हा युएसएमध्ये नव्हता का तो श्रीमंत नव्हता का असा प्रश्न विचारला.

समय रैना याने त्याचा खास शो स्टील अलाईव्हमध्ये इंडियाज गॉट लेटेंटच्या पहिल्या भागात जो वाद झाला होता त्याबाबत भाष्य केलं होतं. तो म्हणाला की या काळात मला जॉर्ज ऑरवेलची एक लाईन आठवली होती. प्रत्येक विनोद हा एक छोटी क्रांतीच असते. विनोद थांबवला जाऊ नये. मात्र पोलिसांनी सांगितलं की आम्ही तुला जेलमध्ये टाकू

त्यावेळी मला विचार आला की ऑर्वेल भारतात अशता तर तो म्हणाला असता की प्रत्येक क्रांती हा एक छोटा विनोद आहे. मला वाटतं की माफी मागून रिकामं होण्यातच शहाणपण आहे. या समाजात एका विनोदाने क्रांती घडू शकत नाही. तुम्ही तेव्हाच लढू शकता ज्यावेळी फाईट ही फेअर असेल. जर फाईट फेअर नसेल तर तुम्ही तिथून निघालेलंच बरं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT