Mukesh Khanna Samay Raina: समय रैनाला अश्लील म्हणणाऱ्या शक्तीमानला त्याचीच भासली गरज... घिरट्या मारत पोहचले त्याच्या गच्चीवर

Mukesh Khanna Samay Raina
Mukesh Khanna Samay Rainapudhari
Published on
Updated on

Mukesh Khanna Samay Raina: या वर्षाच्या एप्रिल महिन्यात कॉमेडियन समय रैनाने अभिनेता मुकेश शर्मावर त्याच्या इंडिया गॉट लेटेंट या शोमध्ये टीका केली होती. समय रैनाच्या या वक्तव्यावर मुकेश खन्नाने देखील टीका करत हा शो अश्लील असल्याचं म्हणत समय रैनाची गाढवावरून धिंड काढायला पाहिजे असे वक्तव्य केलं होतं.

Mukesh Khanna Samay Raina
Controversy : प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमधील विधानावरून गदारोळ! महिलांवर अश्लील टीप्पणी करणा-या तरुणाची नोकरीमधून हकालपट्टी

सार्वजनिकरित्या जरी हे दोघे एकमेकांवर टीका अन् चिखलफेक करत असले तरी ज्यावेळी पैशाचा विषय आला त्यावेळी हे दोघे गळ्यात गळे घालून काम करताना दिसत आहे. या दोघांनी नुकतेच एक जाहिरात केली असून त्यावरून त्यांच्यावर मोठी टिका होत आहे. नेटकऱ्यांना या जाहिरातीमुळे मोठा धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी हे व्यावसायिक एकत्र येणं मान्य नाही असं सांगितलं.

Mukesh Khanna Samay Raina
Pranit More Controversy : सलमान खानने दिला होता सल्ला, तरीही वादांच्या भोवऱ्यात, जाणून घ्या कोण आहे प्रणीत मोरे.

सोमवारी समय रैनाने आपल्या इन्स्टाग्रामवर या जाहिरातीचा व्हिडिओ टाकला. ही जाहिरात एका स्मार्टफोनची असून यात शक्तीमान फेम मुकेश खन्ना देखील आहे. या जाहिरातीच्या व्हिडिओत समय स्मार्टफोनवर कोणशीतरी बोलत असतो. तो म्हणतो की थँक यू यार हा शो पुन्हा सुरू झाला. अंधकार कायम रहात नाही. असं समय म्हणतो तेवढ्यात शक्तीमान आपल्या गिरक्या घेत तिथं येतो.

त्यावेळी समय त्याला तुम्ही माझ्या छतावर काय करत आहात असं विचारतो त्यावर शक्तीमान तुझी वाकडी झालेली शेपटी सरळ करायला आलो आहे असं म्हणतो. शक्तीमान त्याला तीन एफआयआर झाले तरी तू सुधरला नाहीस. तुझं तोंड काळं करायला पाहिजे असं म्हणतो. त्यानंतर तुमच्यावर देखील तोंड काळं केल म्हणून एक एफआयआर दाखल होणार ना असं उत्तर देतो.

Mukesh Khanna Samay Raina
Pranit More Apology: 'माझ्याकडून मोठी चूक झाली'; वादग्रस्त व्हिडिओनंतर प्रणित मोरेची जाहीर माफी, म्हणाला, मला आणखी...

अशी ही त्यांची एकमेकांची खेचाखेची करणारी ही जाहिरात नेटकऱ्यांना काही पसंतीस उतरलेली नाही. एका नेटकऱ्याने हा कोलॅब अजिबात मान्य नाही असं लिहिलं तर दुसऱ्याने अरे हे दोघे एकत्र येतील असा कोणी विचार देखील केला नसेल.

अनेकांनी मुकेश खन्ना यांच्यावर टीका केली आहे. एका युजरने तर शक्तिमान विकाल गेला आहे अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्याने समय रैनासोबतचा वाद तुमच्या बँक बॅलेन्ससाठी चांगला आहे. समयने त्याच्या सर्व टीकाकारांसोबत काम करायाल सुरूवात केली आहे. दुसऱ्याने शक्तीमानची नियत बदलली असं लिहिलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news