

Sanjay Raut On Abhijit Dipke: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कॉकरोज पार्टीचे निर्माते अभिजीत दिपके यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर करून एकच खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत यांनी दिपके आणि मोदी यांची अमेरिकेत भेट झाली होती का असा सवाल केला. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये फक्त दोन ओळी लिहिल्या आहेत. अमेरिकेत कोण कोणास भेटले? एवढेच कॅप्शन देऊन संजय राऊत यांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या कॉकरोज जनता पार्टीबाबत साशंकता उपस्थित केली.
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीच त्यातबरोबर त्यांनी पत्रकार परिषदेत देखील याबाबत प्रश्न विचारला. त्यावर आता पुणे विद्यापीठात आंदोलन करत असलेल्या अभिजीत दिपके यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी आपण नरेंद्र मोदी यांना कधी भेटलेलो नाही असा दावा केला असून हा फोटो AI जनरेटेड असण्याची शक्यता व्यक्त केली.
अभिजीत दिपके हे ज्यावेळी अमेरिकेतून भारतात आले आणि त्यांनी जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेश प्रधान यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं त्यावेळी हे आंदोलन काही दिवस तरी चालेल असं वाटलं होतं. मात्र हे आंदोलन त्याच दिवशी संध्याकाळी संपलं. दिपके हे आपल्या घरी छत्रपती संभाजी नगरमध्ये परतले.
यानंतर दिपके यांच्या गांभिऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. त्यानंतर विरोधी पक्ष देखील त्यांच्या आदोलनाबाबत सावध भूमिकाच घेताना दिसत आहेत. दुसरीकडं त्यांचे यापूर्वीचे आपशी असलेले संबंध पाहता इतर पक्षांनी त्यांच्यापासून अंतर राखले आहे.